भारतीय संघाचा दिग्गज कर्णधार विराट कोहली आयपीएलचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा आहेत. विराट आयपीएलच्या पहिल्या मोसमापासूनच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी (आरसीबी) खेळत आहे. पण त्याने उत्कृष्ट फलंदाजी करूनही आरसीबीला आतापर्यंत विजेतेपद मिळवता आलं नाही.
विराटची आरसीबी (Royal Chellengers Bangalore) संघाशी जोडण्याची कहाणी रंजक आहे. दिल्ली डेअरडेविल्सने एका अतिरिक्त गोलंदाजाला संघात ठेवण्यासाठी विराटला संघात घेतले नाही. याबाबत आयपीएलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रमण (Sundar Raman) यांनी खुलासा केला आहे.
इतकेच नव्हे तर विराटच्या (Virat Kohli) जागी त्याचा मित्र एबी डिविलियर्सला (AB De Villiers) संघात सामील करण्यात आले होते. डिविलियर्स त्याकाळी चांगलाच फॉर्ममध्ये होता. दिल्लीकडे विराटला संघात घेण्याची संधी होती. चाहत्यांनाही वाटले होते, की दिल्ली संघ स्थानिक खेळाडूला म्हणजेच विराटला संघात घेईल. परंतु असे झाले नाही.
यामागील कहाणीबाबत रमण यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले, “रंजक बाब अशी आहे, की लिलावाच्या एक महिन्यापूर्वीच भारताने १९ वर्षाखालील विश्वचषकावर आपली मोहोर उमटवली होती. भारताचे नेतृत्व त्यावेळी विराटनेच केले होते. त्यानंतर आम्ही लिलावाच्या काही दिवसांनंतर १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी एक वेगळा ड्राफ्ट ठेवण्याचा निर्णय घेतला. आश्चर्याची बाब अशी होती की त्या ड्राफ्टमध्ये निवडला जाणारा विराट हा पहिला खेळाडू नव्हता.”
“आयपीएल २००८ मोसमात दिल्लीने विराटला संघात घेतले नाही. दिल्ली संघाचे असे म्हणणे होते, की त्यांच्या संघात विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि एबी डिविलियर्स यांसारखे फलंदाज आहेत, अशामध्ये संघाला एका फलंदाजाची नाही, तर एका गोलंदाजाची आवश्यकता आहे. त्यामुळे दिल्लीने वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानला (Pradeep Sangwan) आपल्या संघात सामील केले होते. आरसीबीने विराटला आपल्या संघात घेतले आणि त्यानंतर बाकी सर्व इतिहास माहितच आहे,” असेही रमण पुढे म्हणाले.
आरसीबीने विराटला आपल्या संघात सामील केले. आयपीएलच्या सुरुवातीच्या मोसमात विराटला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याने पहिल्या मोसमात १३ सामने खेळताना केवळ १६५ धावा केल्या होत्या. पुढे त्याने चांगली कामगिरी केली. विराटने १७७ आयपीएल सामन्यांमध्ये ३७.८४ च्या सरासरीने ५४१२ धावा केल्या आहेत.
दुसरीकडे सांगवानने केवळ ३९ सामने खेळत ३३.५७ च्या सरासरीने केवळ ३५ विकेट्स घेतल्या आहेत. सांगवान एक वेळा डोपिंग टेस्टमध्येही सापडला होता. बीसीसीआयने त्याच्यावर १५ महिन्यांची बंदी घातली होती. २०११मध्ये दिल्ली संघाला सोडल्यानंतर त्याच्या कारकिर्दीची आकडेवारी खाली घसरत गेली.
ट्रेंडिंग घडामोडी-
-श्रीसंत म्हणतो, ही ट्रॉफी जिंकली की मी धोनीला खांद्यावर घेऊन मारणार मैदानाला फेरी
-रोहितचा सराव करणं या लोकांना आवडलं नाही, राज्य सरकारला केली अपिल
-१ जानेवारी २०१५ रोजी आयसीसी क्रमवारीत टाॅप १०मध्ये असलेले खेळाडू आज मात्र