भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. विराटने इंडियन प्रीमियर लीगमध्ये मोठा काळ आरसीबीचे नेतृत्व केले. पण मागच्या 15 आयपीएल हंगामात एकदाही तो संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिला नाही. यावर्षी नव्याने सुरुवा झालेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबी संघाला अपेक्षित सुरुवात मिळू शकली नाहीये. याच पार्श्वभूमीवर विराटने आरसीबीच्या या महिला संघीच भेट घेतली आणि मोलाचे मार्गदर्शनही केले.
महिला प्रीमियर लीग 2023 हंगामातील पहिल्या पाच सामन्यांमध्ये आरसीबी संघाला पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेतील सहावा सामना यूपी वॉरिअर्सविरुद्ध आरसीबीने अखेर जिंकला आणि पराभवाचे सत्र थांबवले. या विजयाच्यापूर्वीच आरसीबी महिला संघाने दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी चर्चा केली होती. आरसीबीच्या महिला खेळाडूंसोबत चर्चा करतानाचे विराटचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सलग पाच पराभवांनंतर आरसीबी महिला खेळाडूंना पुन्हा नवीन प्रेरणा देण्यासाठी विराटचा हा संवाद चांगलाच कामी आल्याचे पाहायला मिळाले.
डब्ल्यूपीएलच्या (WPL) 13व्या सामन्यात आरसीबीने यूपी वॉरिअर्सला 5 विकेट्सने पराभूत केले. आरसीबीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून गुरुवारी (16 मार्च) विराट आणि महिला खेळाडूंमधील संवादाचा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओत विराट म्हणत आहे की, “मी मागच्या 15 वर्षांपासून आयपीएल खेळत आहे आणि अजून एकही विजेतेपद पटकावू शकलो नाहीये. पण यामुळे प्रत्येक वर्षी आयपीएल खेळण्यासाठी असणारी उत्सुकता यामुळे कमी होत नाही. प्रत्येक सामन्यात प्रयत्न करणे, हेच मी करू शकतो. त्यामुळे आपल्याकडे किती संधी आहेत, हे पाहा. आपल्यासोबत किती वाईट होत आहे, असा विचार करत बसू नका. प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू शकते आणि गोष्टी यापेक्षा वाईटही होऊ शकतात. आपण अजून आयपीएल जिंकली नाहीये, पण ला वाटते आपल्याकडे सर्वोत्तम चाहते आहेत. आपण प्रत्येक वेळी चाहत्यांसाठी ट्रॉफी जिंकू शकत नाही, पण त्याच्यासाठी 110 टक्के प्रदर्शन नक्कीच करून दाखवू शकतो.”
दरम्यान, डब्ल्यूपीएलच्या पहिल्या पाच पैकी चार सामन्यांत पराभव स्वीकारल्यानंतर आरसीबी संघ गुणतालीकेत चौथ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफ्समध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीकडे नगण्य आहे. पण विराटच्या मते शक्यता थोडी असली, तरी संघाने अपेक्षा सोडता कामा नये. अनेकदा अशा संधी सत्यात देखील उतरतात. डब्ल्यूपीएलच्या या रहिल्या हंगामात गुणतालिकेतील पहिला क्रमांक हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने जिंकला आहे.
(Virat Kohli guided the RCB Women’s team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तमाम क्रिकेटप्रेमींच्या आठवणीतील दिवस: जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिनने केलं होतं ‘शतकांचं शतकं’
अखेर WPL मध्ये आरसीबीची बोहनी! युवा कनिका आणि पेरी ठरल्या पहिल्या विजयाच्या शिल्पकार