श्रीलंका संघाचा युवा फिरकी गोलंदाज वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) अलिकडच्या काळात त्याच्या कामगिरीमुळे सर्वाच्या नजरेत आला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शनामुळे त्याने जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माणे केले आहे. हसरंगा आयपीएल २०२१ मध्ये विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये खेळला आहे. आता हसरंगाने विराटविषयी मोठे विधान केले आहे.
हसरंगाने सांगितल्याप्रमाणे विराट त्याचा आवडता खेळाडू आहे आणि हसरंगाला विश्वास आहे की, एक दिवस तो विराटची विकेट नक्की घेईल. हसरंगाने भारताचा कसोटी कर्णधार विराटसोबतच पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (glenn maxwell) यांची विकेट घेण्याची देखील इच्छा व्यक्त केली आहे.
हसरंगा सध्या ज्याप्रकारची गोलंदाजी करत आहे, त्यामुळे अनेकदा त्याची तुलना श्रीलंकेचे माजी दिग्गज मुथय्या मुरलीधरन आणि रंजना हेराथ यांच्यासोबत केली जाते. हसरंगाला त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनाबाबत जेव्हा प्रश्न विचारला गेला, तेव्हा तो म्हणाला की, “जेव्हा मी गोलंदाजी करत असतो, तेव्हा नेहमी विकटे घेण्यासोबतच संघासाठी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. याच कारणास्तव मी यशस्वी होतो.”
“मी नेहमी चांगले प्रदर्शन करण्याविषयी विचार करतो. मला कसलाच दबाव जाणवत नाही. मी पुढचा मुरलीधरन किंवा हेराथ बनू इच्छित नाही. मला पहिला हसरंगा बनायचे आहे,” असे तो म्हणाला.
यावर्षी जेव्हा भारतीय संघ मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला होता, तेव्हा हसरंगाने भारतीय खेळाडूंना त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले होते. त्याच्या या प्रदर्शनाची दखल घेऊनच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी त्याला संघात सामील केले होते.
त्याव्यतिरिक्त त्याने मागच्या महिन्यात पार पडलेल्या टी२० विश्वचषकात देखील श्रीलंका संघासाठी उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. त्याने यादरम्यान खेळलेल्या ८ सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या होत्या आणि सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. सध्या तो श्रीलंकेत खेळल्या जात असलेल्या लंका प्रमीमियर लीगमध्ये खेळत आहे. या लीगमध्ये जाफना किंग्जसाठी खेळताना त्याने आतापर्यंत चार सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
रोहित घेणार विराटपेक्षा अधिक वेतन? चर्चेला आला ऊत
गॅबा कसोटीचे अचानक बंद झाले जगभरातील लाईव्ह टेलिकास्ट, डीआरएस ठप्प; वाचा सविस्तर