भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (SA vs IND) यांच्यातील दुसरा कसोटी सामना (2nd Test) जोहान्सबर्ग येथे खेळला जाणार आहे. सोमवारपासून (३ जानेवारी) खेळल्या जाणाऱ्या या सामन्याची सुरुवात होण्यास अवघ्या काही मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. अशात नाणेफेकीपूर्वी जोहान्सबर्गमधून धक्कादायक वृत्त पुढे येत असून भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यास अनुपस्थित राहणार आहे. त्याच्याजागी हनुमा विहारी (Hanuma Vihari) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली गेली आहे. तर केएल राहुल (KL Rahul) संघाचे नेतृत्त्व करेल.
विराटच्या अनुपलब्धतेबद्दल माहिती देताना प्रभारी कर्णधार राहुल म्हणाला की, दुर्दैवाने विराटला पाठीच्या वरच्या बाजूला दुखापत झाली आहे. फिजिओ त्याच्यावर काम करत आहेत आणि आशा आहे की तो पुढच्या कसोटीपर्यंत बरा होईल. विराटच्या जागी हनुमा विहारी खेळणार आहे. हा फक्त एकच बदल आहे.
Virat Kohli is not playing the second Test against South Africa.
— Johns. (@CricCrazyJohns) January 3, 2022
तसेच आपल्याला मिळालेल्या जबाबदारीबद्दल बोलताना राहुल म्हणाला, आपल्या देशाचे नेतृत्व करणे हे प्रत्येक भारतीय खेळाडूचे स्वप्न असते. खरोखर ही सन्मानाची गोष्ट आहे आणि मी या आव्हानाची वाट पाहत आहे. आम्हाला येथे काही चांगले विजय मिळाले आहेत आणि आशा आहे की आम्ही ते पुढे असेच सुरू ठेवू. एकूणच सेंच्युरियनमध्ये आम्ही चांगले खेळलो. आम्ही एक संघ म्हणून खरोखरच चांगली कामगिरी केली. आता या सामन्याबद्दल आम्ही खरोखरच उत्सुक आहोत.
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटचे चाणक्य…! ‘हे’ आहेत आशियातील सर्वात बुद्धिमान कर्णधार
मोठी बातमी! ‘या’ पाकिस्तानी अष्टपैलूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला अलविदा, कसोटीत केलंय द्विशतक