माऊंट मॉनगनुई। काल(2 फेब्रुवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध पाचवा आणि शेवटचा टी20 सामना 7 धावांनी जिंकत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवला. काल हा सामना सुरु असताना भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन मैदानात बाऊंड्री लाईनच्या बाहेर गप्पा मारत बसलेले दिसले. या दरम्यान त्यांच्याबरोबर रिषभ पंतही होता.
त्यामुळे त्यांच्या या गप्पाबद्दल काल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. कालच्या सामन्यात हे दोघेही खेळत नव्हते. विराटने काल विश्रांती घेतली होती. तर विलियम्सन खांद्याच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नव्हता.
सामन्यानंतर विराटला विलियम्सनबरोबर झालेल्या चर्चेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी विराटने विलियम्सनची प्रशंसा केली.
विराट म्हणाला, ‘विलियम्सन आणि माझी समान मानसिकता आहे आणि आमची विचारसरणीही समान आहे. जगाच्या निरनिराळ्या भागातील असूनही आमची समान विचारसरणी आहे आणि आम्ही सारख्या भाषेत बोलतो, हे आश्चर्यकारक आहे.’
विराट पुढे म्हणाला, ‘धावफलक काहीही असला तरी माझ्या मते न्यूझीलंड क्रिकेट योग्य हातात आहे. संघाचे नेतृत्व करण्यासाठी विलियम्सन योग्य व्यक्ती आहे. मी त्याला भविष्यासाठी आणि वनडे मालिकेसाठी शुभेच्छा देतो. न्यूझीलंड संघ हा जगातील असा एक संघ आहे ज्याचा खेळ प्रत्येकाला पाहणे आवडते आणि त्यांच्या विरुद्ध खेळणेही आवडते.’
आता न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 5 फेब्रुवारीपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे.
आयसीसी टी२० क्रमवारीत केएल राहुलने मिळवले कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान!!
वाचा👉https://t.co/C31a9WGvgC👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @klrahul11— Maha Sports (@Maha_Sports) February 3, 2020
टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्मा उर्वरित न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर
वाचा👉https://t.co/AOEfeE3j4H👈#म #मराठी #Cricket #NZvIND #TeamIndia @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) February 3, 2020