---Advertisement---

नोटबूक सेलिब्रेशनबद्दल कर्णधार विराट कोहलीचा मोठा खूलासा; म्हणाला…

On: शनिवार, डिसेंबर 7, 2019 4:58 PM
---Advertisement---

हैद्राबाद। शुक्रवारी(6 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात(India vs West Indies) पहिला टी20 सामना पार पडला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 208 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना 6 विकेट्सने विजय मिळवला.

भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) नाबाद अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 50 चेंडूत नाबाद 94 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले.

त्याच्या या खेळीबरोबरच त्याने वेस्ट इंडिजचा गोलंदाज केसरिक विल्यम्सच्या(Kesrick Williams) गोलंदाजीवर षटकार मारल्यानंतर केलेल्या नोटबूक सेलिब्रेशनचीही(notebook celebration) या सामन्यानंतर बरीच चर्चा झाली.

या सामन्यात विल्यम्सने गोलंदाजी केलेल्या 16 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विराटने षटकार मारला. या षटकारानंतर विराटने त्याची बॅट पायाला टेववून ठेवली आणि वहीत नोंद करण्यासारखी (नोटबूक सेलिब्रेशन) कृती केली. विराटची ही कृती पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. 

पण सामन्यानंतर त्याच्या या सेलिब्रेशनमागील कारण सांगताना विराटने म्हणाला की विल्यम्सने 2017 ला जेव्हा जमैकाला झालेल्या सामन्यात त्याला 39 धावांवर बाद केले होते, तेव्हा साधारण अशाच पद्धतीचे सेलिब्रेशन विल्यम्सने केले होते. त्या सेलिब्रेशनचे हे उत्तर होते.

https://twitter.com/BCCI/status/1203019305320759297

विराट म्हणाला, ‘हे (विल्यम्सच्या सेलिब्रेशनबद्दल) सीपीएलमधील(कॅरेबियन प्रीमीयर लीग) गोष्ट नाही. हे जमैकामध्ये घडले होते. विल्यम्सने तेव्हा मला बाद केल्यानंतर असे सेलिब्रेशन केले होते. त्यामुळे मी विचार केला की मीही नोंदवहीत काही नोंदी करुन ठेवतो. पण अखेरीस सर्व काही ठिक आहे. हेच तर पहायचे असते.’

‘स्पर्धात्मक क्रिकेट खेळायचे आणि शेवटी हात मिळवून हाय-फाय द्यायचा. क्रिकेट हे एवढेच आहे. स्पर्धात्मक क्रिकेट खेळा पण तेवढाच प्रतिस्पर्ध्याचा आदर ठेवा,’ असेही विराट म्हणाला.

https://twitter.com/ChavanGaurav18/status/1203174310807924736

शुक्रवारी झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 207 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) 56 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तर कायरन पोलार्डने(Kieron Pollard) 40 धावांची खेळी केली होती.

त्यानंतर 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार विराटने नाबाद 94 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर केेएल राहुलने(KL Rahul) सलामीला फलंदाजी करताना 40 चेंडूत 62 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

https://www.instagram.com/p/B5vQaqpAf6E/

https://twitter.com/Maha_Sports/status/1203245702106632192

https://twitter.com/Maha_Sports/status/1203235918485704705

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---