भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना विराट कोहलीसाठी (Virat Kohli) खूपच खास होता. कारण, हा त्याच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना होता. कोहली ही कामगिरी करणारा १२ वा खेळाडू आहे. शुक्रवारी (०४ मार्च) सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) विराट कोहलीला त्याच्या १०० व्या कसोटी सामन्यानिमित्त खास कॅप दिली.
यावेळी बोलताना विराट कोहली म्हणाला की, “मी फक्त एवढंच सांगेन की आजच्या घडीला मी तिन्ही फॉरमॅट, आयपीएलमध्येही खेळतो. नवी पिढी केवळ हेच पाहू शकते की मी क्रिकेटच्या सर्वात पवित्र फॉरमॅटमध्ये १०० सामने खेळलो आहे.” कोहलीचा हा सामना पाहण्यासाठी पत्नी अनुष्का शर्मा आणि भाऊ विकास कोहली सुद्धा मैदानात उपस्थित होते. कोहली म्हणाला की, “माझी पत्नी आणि माझा भाऊ येथे आहेत. सर्वांनाच खूप गर्व आहे. आपला संघ येथे आहे, यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते.”
राहुल द्रविडने विराट कोहलीला कॅप दिल्यानंतर विराट म्हणाला की, “शंभराव्या कसोटीची कॅप माझ्या बालपणीच्या हिरोकडून मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझ्याकडे १५ वर्षाखालील विश्वचषकाचा तो फोटो अजूनही आहे, ज्यामध्ये मी तुमच्यासोबत उभा आहे आणि तुम्हालाच पाहत आहे.”
#TeamIndia Head Coach Rahul Dravid presents @imVkohli with his 100th baggy blue to commemorate his 100th appearance in whites.#VK100 | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/PVFhsbe4Rj
— BCCI (@BCCI) March 4, 2022
ट्विटरवर शेअर केलेल्या राहुल द्रविडसोबतच्या फोटोबाबत बोलताना विराटने लिहिले की, “अशाप्रकारचे क्षण तुम्ही कुठे पोहोचला आहात याची जाणीव करून देतात. स्वप्न खरी होतात असं मला वाटते.” सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, हरभजन सिंग आणि इशांत शर्मा यांच्यानंतर १०० कसोटी सामने खेळणारा कोहली हा १२ वा भारतीय क्रिकेटपटू आहे.
Very grateful for the journey so far. A big day and a special test match. Can't wait to get this started. 🇮🇳 pic.twitter.com/NPAJNSbl2U
— Virat Kohli (@imVkohli) March 3, 2022
सध्या विराटचा वाईट काळ सुरू आहे. तो सध्या कोणत्याच क्रिकेट प्रकारातील कर्णधार नाही. मागच्या अडीच वर्षांपासून विराटने शतक झळकावले नाही. त्यामुळे देशभरातील क्रिकेट चाहते विराटच्या शतकाच्या प्रतिक्षेत आहेत. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ७० शतके झळकावली आहेत. यामध्ये ४३ शतके एकदिवसीय क्रिकेटमध्ये, तर २७ शतके कसोटीमध्ये झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटचा १०० व्या कसोटीत बीसीसीआय अध्यक्षांच्या विक्रमालाच धक्का, पाहा काय केलाय कारनामा
कोण आहे पाकिस्तानचा युवा सलामीवीर, ज्याने चक्क कमिन्सला फोडला घाम