भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने हा नेहमीच त्याने मैदानावर केलेल्या विविध विक्रमांबरोबरच तो त्याच्या मैदानाबाहेरील कृत्यांमुळेही चर्चेत असतो. तो अनेकदा सामाजिक भान ठेवून दानधर्म करत असतो, अनेकांची मदत करत असतो. तसेच लहान मुलांमध्येही तो नेहमीच मिसळताना दिसतो. नुकतेच त्याने वाईज या ब्रँडच्या प्रचारातून मिळणारा नफा १०,००० कुपोषित मुलांच्या मदतीसाठी दान करणार असल्याचे सांगितले आहे.
विराटने हेल्थकेअर आणि सॅनिटेशन प्रोडक्टच्या वाईज या ब्रँडशी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून करार केला आहे. या करारातून मिळणारा नफा तो महाराष्ट्रातील ‘राह फाऊंडेशन’ या चॅरिटी संस्थेला देणार आहे. ही संस्था महाराष्ट्रातील वंचित आणि कुपोषित मुलांसाठी काम करते. त्यामुळे विराट कोहली फाउंडेशनच्या सीएसआर अंतर्गत महाराष्ट्रातील १०,००० मुलांना कुपोषणापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल.
वाईजबरोबर झालेल्या कराराबद्दल विराटने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘एक खेळाडू म्हणून आम्हाला खुप प्रेम मिळते. आम्हाला हिरो म्हणून सन्मान मिळतो. पण या कठिण काळात कोविड-19 योद्धाच आपले खरे हिरो आहेत, जे दुसऱ्यांचा जीव वाजवण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावत आहेत.’
तसेच विराट म्हणाला, ‘वाईजशी जोडला गेल्याने मला खूप आनंद झाला आहे. कारण ही केवळ जागतिक दर्जाची उत्पादने नाहीत, ज्यांनी उत्पादनाच्या वेळी कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे, तर मला सामाजिक कारणासाठी योगदान देण्याची संधी देखील दिली आहे. मी वाईजकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून भारतात कुपोषणाविरुद्ध लढा देण्याच्या उद्देशाने सामील होत आहे.’
तसेच वाईजचे संस्थापक अक्षत जैन यांनी म्हटले आहे की ‘विराट कोहलीकडे तत्परता, शिस्त आणि जागतिक दर्जाचे मानके अशी मुल्य आहेत, जी त्याच्या व्यक्तिमत्त्वातून दिसून येतात. आम्ही आमचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून त्याची निवड केली आहे. आम्हाला आनंद आहे की आमच्या माध्यमातून तो सामाजिक परिवर्तनाच्या उपक्रमात भाग घेत आहे.’
विराट सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तिथे तो वनडे आणि टी20 ची पूर्ण मलिका खेळणार आहे. तर कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर तो पालकत्व रजा घेऊन भारतात परतेल. जानेवारी 2021 मध्ये त्याची पत्नी अनुष्का शर्मा त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईच ट्विटर किंग्ज! आयपीएलमधील खराब कामगिरी नंतरही धोनीची CSK ‘या’ बाबतीत अव्वल
…तर ऑस्ट्रेलियात पुजारा करु शकतो नवा रेकॉर्ड; तेंडुलकर, गांगुली, कोहलीच्या पंक्तीत बसण्याची संधी
ट्रेंडिंग लेख –
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी