भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे. जेव्हापासून त्याने संघाचे कर्णधारपद स्वीकारले आहे. तेव्हापासून भारतीय संघाने द्विपक्षीय मालिकांमध्ये मोठमोठ्या सामन्यात विजय मिळवले आहेत. परंतु अनेकांना माहीत नसेल की, २०१५ त्याने एक संकल्प केला होता, ज्याचा खुलासा दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटूने केला आहे.
यूट्यूब चॅनल क्रिकेट लाईव्ह स्टोरीसोबत चर्चा करताना माजी दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू ॲलेन डोनाल्डने म्हटले की, “मला आठवत आहे, विराटने मला २०१५ मध्ये म्हटले होते की, भारत अव्वल क्रमांकाचा कसोटी संघ बनेल. त्याचे हे बोलणे चुकीचे नव्हते. त्याला माहित होते की, तो कुठल्या मार्गे जात आहे. त्याने असे देखील म्हटले होते की, मला फक्त एक मजबूत संघ हवा आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “त्याला भारतीय संघाला क्रिकेट विश्वातील सर्वात मजबूत संघ बनवायचे होते. त्याला विश्वास होता की, भारतीय संघ परदेशात जाऊन विजय मिळवेल. भारतीय संघ कुठल्याही संघाला पराभूत करेल. तसेच भारतीय संघाकडे मजबूत गोलंदाजी आक्रमण असेल.”
हा संकल्प विराट कोहलीने पूर्ण करून दाखवला आहे. गेल्या ५ वर्षांपासून भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी संचाच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. तसेच भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांना त्यांच्याच देशात जाऊन पराभूत केले आहे.(Virat Kohli told me in 2015 that india will become the worlds best test team says Allan Donald)
तसेच ॲलेन डोनाल्ड यांनी जसप्रीत बुमराहबद्दल बोलताना म्हटले की, “माझे असे म्हणणे आहे की, हा मुलगा खूप पुढे गेला आहे. खेळाच्या तीनही प्रकारात त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे.”
जसप्रीत बुमराह गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या गोलंदाजी आक्रमणात मोलाची भूमिका पार पाडत आहे. त्याने नुकत्याच इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
नुसता धुरळा! २३ षटकारांसह चोपल्या ३०२ धावा, टी२० विश्वचषकापूर्वी इंग्लंडचा ‘हा’ फलंदाज फॉर्मात
तयारी आयपीएल ट्रॉफी पटकावण्याची! क्वारंटाईन संपवून सीएसकेची सरावास सुरुवात, फोटो व्हायरल
आयसीसीची मोठी घोषणा; महिला विश्वचषक २०२२ च्या क्वालिफायरचे ‘हा’ देश भूषवेल यजमानपद