ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने ऑस्ट्रेलिया संघाविषयी मोठे आणि वादग्रस्त असे विधान केले होते. यावेळी तो म्हणाला होता की, २०१८ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मुद्दाम भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबद्दल अपशब्द वापरले नव्हते.
जेणेकरून त्यांना आयपीएल करारात स्थान मिळेल. परंतु क्लार्कच्या (Michael Clarke) या विधानाला ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनने खोडले आहे.
ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना पेन (Tim Paine) म्हणाला की, “ऑस्ट्रेलियन खेळाडू विराटबरोबर (Virat Kohli) मुद्दाम चांगले वागण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा त्याला बाद करण्याचा प्रयत्न करत नाहीत, अशा प्रकारचे काहीही माझ्या पाहण्यात आले नाही. ज्या खेळाडूंच्या हातात बॅट किंवा चेंडू होता, ते सर्वजण आपल्या संघाच्या विजयासाठी पूर्ण प्रयत्न करत होते.”
“मला माहिती नाही की, विराटबरोबर चांगले कोण वागत होते. पण आम्हाला हे नक्की माहिती होते की, विराटशी गैरव्यवहार करायचा नाही, कारण असे केल्यास तो आणखी चांगल्याप्रकारे फलंदाजी करतो,” असेही पेन म्हणाला.
भारतीय संघाला ऑक्टोबर २०२०पासून जानेवारी २०२१ पर्यंत ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्यात कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळायची आहे. याबद्दल बोलताना पेन म्हणाला की, “सध्या कोणालाच माहिती नाही की, या मालिकेत काय होईल. आम्ही ‘द टेस्ट’ (The Test Documentary) या डॉक्यूमेंट्रीमध्ये पाहिले की, त्यावेळी आमच्यात काही सामन्यांमध्ये थोडीफार शाब्दिक चकमक झाली होती. मी आयपीएलबद्दल विचार करत नव्हतो. त्यामुळे माझ्याकडे गमावण्यासारखे काहीही नव्हते.”
परंतु जेव्हाही आमचा संघ ऑस्ट्रेलियासाठी कसोटी सामने खेळतात, तेव्हा ते स्वत:ला यामध्ये झोकून देऊन चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात. मला पूर्ण आशा आहे की, जेव्हा ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज विराटला गोलंदाजी करतात, त्यावेळी त्यांच्या डोक्यात आयपीएलचा करार नसते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कार घेऊन भारतीय क्रिकेटपटू थेट बाजारात, पोलीसांनी फाडलं चलन
-रमीज राजा व शोएब मलिकमध्ये ट्विटरवर जोरदार भांडणं
-इंग्लंडमध्ये इंग्लंडला धोबीपछाड देणार ३ महान भारतीय कर्णधार






