विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय नोंदवला आहे. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी देखील घेतली आहे. विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेत मिळवलेला हा दुसरा कसोटी विजय ठरला आहे. विराट कर्णधाराच्या रूपात दक्षिण अफ्रिकेसह जवळपास सर्वच देशांमध्ये सर्वाधिक कसोटी विजय मिळवून देणारा खेळाडू ठरला आहे.
भारतीय संघाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला, तर विराट कोहली आतापर्यंतच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. परंतु, फक्त कसोटी क्रिकेटचा विचार केला, तर विराटला सर्वोत्तम कर्णधार म्हटले, तरी कोणाचीच काही हरकत नसावी. कारण विराटची कसोटी क्रिकेटमधील कर्णधार म्हणून कामगिरी देखील तशीच आहे.
भारताने दक्षिण अफ्रिकेत विराटच्या नेतृत्वात भारताने गुरुवारी (३० डिसेंबर) दुसरा कसोटी सामना जिंकला. आता विराट दक्षिण अफ्रिकेत भारताला सर्वाधिक कसोटी सामने जिंकवून देणार कर्णधार ठरला आहे. दक्षिण अफ्रिकेप्रमाणेच इतर देशातही विराटने सर्वाधिक कसोटी सामने जिंकवून दिले आहेत.
अधिक वाचा – विषय आहे का? फक्त भारत नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये ‘ही’ किमया साधणारा विराट बनला एकमेव कर्णधार
इंग्लंडमध्ये विराटच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक तीन कसोटी सामने जिंकले. तसेच वेस्ट इंडीजमध्ये सर्वाधिक दोन, श्रीलंकेत सर्वाधिक पाच आणि भारतात सर्वाधिक २४ कसोटी सामने विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियातील प्रदर्शन पाहिले, तर विराट, अजिंक्य रहाणे आणि बिशन सिंग बेदी यांनी प्रत्येकी २ कसोटी सामन्यात संघाला विजय मिळवून दिला.
न्यूझीलंड एकमात्र असा देश आहे, ज्याठिकाणी विराटने कसोटी सामने जिंकले नाहीत. न्यूझीलंडमध्ये भारताचे माजी कर्णधार मन्सूर पतौडी यांनी संघाला सर्वाधिक तीन कसोटी सामने जिंकवून दिले आहेत.
या देशांमध्ये सर्वाधिक कसोटी सामने जिंकवून देणारे भारतीय कर्णधार
इंग्लंड – विराट कोहली (३)
ऑस्ट्रेलिया – विराट कोहली, अजिंक्य रहाणे, बिशन सिंग बेदी (प्रत्येकी २)
दक्षिण अफ्रिका – विराट कोहली (२)
वेस्ट इंडीज – विराट कोहली (४)
न्यूजीलंड – मन्सूर पतौडी (३)
श्रीलंका – विराट कोहली (५)
भारत – विराट कोहली (२४)
महत्वाच्या बातम्या –
गोव्यात स्टार फुलबॉलर रोनाल्डोचा पुतळा उभारल्याने तापले वातावरण, ‘पोर्तुगाल कनेक्शन’मुळे पेटलाय वाद
व्हिडिओ पाहा – क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार