केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकली. आता भारताला कसोटी मालिका सुरू करायची आहे. याआधी विराट कोहली भारतात परतला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या फायनलपासून विश्रांतीवर आहेत. हे तिघेही या कसोटी मालिकेत संघाचा भाग आहेत. दरम्यान, विराट कोहलीचे भारतात परतणे संघासाठी चांगले संकेत नाहीत. कोहलीपूर्वी मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता.
नुकताच कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याला कौटुंबिक कारणामुळे भारतात परतावे लागले. क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. परंतु, त्याच्याबद्दल कोणतेही अधिकृत अपडेट किंवा कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. परंतु बीसीसीआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, सेंच्युरियनमध्ये 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी तो वेळेत जोहान्सबर्गला परतेल.
तीन दिवसीय सराव सामना वगळण्यासाठी संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयची परवानगी घेतल्यानंतर कोहली तीन दिवसांपूर्वी मुंबईला रवाना झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. भारतीय खेळाडू सध्या प्रिटोरियामध्ये सराव करत आहेत. कोहली लवकरच परतण्याची शक्यता आहे.
ऋतुराजही झाला मालिकेतून बाहेर:
तर 26 वर्षीय फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला 19 डिसेंबर रोजी पोर्ट एलिझाबेथ येथे यजमान संघाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बोटाला दुखापत झाली. यामुळे मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यातही तो संघाचा भाग नव्हता. ऋतुराजबद्दल अपडेट देताना बीसीसीआयने म्हटले होते की, ‘दुसऱ्या वनडेत क्षेत्ररक्षण करताना बोटाला झालेल्या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला नाही. तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. आता अपडेट समोर आले आहे की, दोन्ही कसोटी सामन्यांपूर्वी तो बरा होण्याची कोणतीही शक्यता नाही. बीसीसीआयशी बोलणं केल्यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. तो शनिवारपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. (Virat returned to India before the Test series against Africa while Rituraj was ruled out of the series)
हेही वाचा
IND vs SA: मोठा खुलासा; ऋतुराज गायकवाड का खेळला नाही तिसरा सामना, समोर आले मोठे कारण
IPL 2024: कसं शक्य आहे! लिलावात मिळाले २० लाख, पण प्रत्यक्ष मिळणार ५० लाख






