भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर त्याच्या बिनधास्त शैलीसाठी खूप लोकप्रिय आहे. जर भारत-पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना असेल, तर नक्कीच चाहते सेहवागच्या पोस्टची वाट पाहत असतात. शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर भारताच्या विजयानंतर माजी सलामीवीराने त्याच्या चाहत्यांना निराश केले नाही आणि एक मजेदार पोस्ट केली.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाने 117 चेंडू शिल्लक असताना पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. यानंतर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने गंमतीत पोस्ट केली की, ‘मोठ्या मुलांनी शाळेतील मुलांना हरवले असे दिसते.’
Looks like the big boys are playing against school kids.
Total demolition of Pakistan.— Virender Sehwag (@virendersehwag) October 14, 2023
भारतीय संघाचा फोटो शेअर करत सेहवागने लिहिले की, “हा तर फुसका बाॅम्ब निघाला. मोठ्या पोरांनी शाळकरी पोरांचा पराभव केला असे वाटले. पाकिस्तान पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. पण फलंदाजी सर्वांना मिळाली. पाकिस्तानी गोलंदाजांना लाज वाटू लागली होती आणि शर्माजी तापले होते. मस्त खेळी.” सेहवागने यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या खेळीचे कौतुक केले. एकदिवसीय विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर सलग आठवा विजय ठरला.
https://www.instagram.com/p/CyYlHZbrP7a/
भारतीय कर्णधार रोहित शर्माने शनिवारी पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानचा संपूर्ण डाव 42.5 षटकांत 191 धावांत आटोपला. काहीकाळ पाकिस्तानचा डाव कर्णधार बाबर आझम (50) आणि मोहम्मद रिझवान (49) यांनी चांगलाच सांभाळला होता, पण सिराजने बाबरला त्रिफळाचीत करताच संपूर्ण पाकिस्तानच्या डावाची अवस्था बिकट झाली. पाकिस्तानचा डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला.
पाकिस्तान संघाने शेवटच्या 8 विकेट्स केवळ 36 धावांत गमावल्या होत्या, तर भारताकडून कर्णधार रोहित शर्मा (86) आणि श्रेयस अय्यर (53*) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अवघ्या 30.3 षटकांत तीन गडी गमावून हे सहज लक्ष्य गाठले. (Virender Sehwag eye-catching post after Indias victory know here)
हेही वाचा-
लाईव्ह सामन्यातच शास्त्रींनी केले आफ्रिदीला ट्रोल; म्हणाले, ‘तो काय वसीम अक्रम नाही, त्याला हवेत…’
सचिन ते बुमराह, विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध हिरो बनलेले 6 धुरंधर, एक तर तीनदा चमकला