---Advertisement---

“जर नटराजनने बुमराहसारखीच कामगीरी केली, तर…”, सेहवागने दोघांबद्दल सांगितला अजब योगायोग

On: शनिवार, डिसेंबर 5, 2020 8:40 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी (4 डिसेंबर) कॅनबेरा यथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाने 11 धावांनी विजय मिळवला. टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनने पहिल्याच सामन्यात शानदार गोलंदाजी केली आणि तीन बळी टिपले.

एवढेच नव्हे, तर बुधवारी(2 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाच्या वनडे सामन्यातही त्याला 2 बळी घेण्यात यश आले होते. त्याचे प्रदर्शन पाहून भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने टी नटराजनची तुलना भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशी केली आहे.

टी नटराजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

सेहवागने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात टी नटराजन आणि जसप्रीत बुमराह या दोघांचेही फोटो शेयर करत आकडेवारीच्या माध्यमातून या दोघांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत घडलेल्या काही सारख्या गोष्टी सांगितल्या आहेत.
सेहवागने लिहिले की, “अशा प्रकारचे योगायोग पाहायला आवडते.”

सेहवानने या दोघांबद्दल टिपलेले योगायोग –

-बदली खेळाडू म्हणून दोघांचीही भारतीय संघात निवड झाली
– दोघांनीही ऑस्ट्रेलियामध्ये वनडे आणि टी20 सामन्यात पदार्पण केले.
-दोघांनीही मालिकेच्या शेवटच्या वनडे सामन्यातून पदार्पण केले.
– या दोघांनीही पदार्पण केलेल्या मालिकेत भारताने फक्त एक सामना जिंकला.
– दोघांनीही त्यांच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 2 बळी घेतले.
– त्यांच्या पहिल्या टी20 सामन्यात दोघांनीही तीन बळी घेतले.

“बुमराह प्रभावी गोलंदाज आहे. जर टी नटराजननेही त्याच्यासारखीच कामगीरी केली, तर भारताचा वेगवान गोलंदाजी घातक ठरू शकेल.” असेही पुढे सेहवागने लिहिले आहे.

https://www.instagram.com/p/CIYaMOcgmZL/?utm_source=ig_web_copy_link

 

टी नटराजनने पहिल्या टी20 सामन्यात चार षटकांत 30 धावा देऊन तीन बळी घेतले. डार्सी शॉर्ट, ग्लेन मॅक्सवेल या आक्रमक फलंदाजांना त्याने तंबूचा मार्ग दाखवला.

महत्त्वाच्या बातम्या –

“सब्स्टिट्यूट खेळाडू त्याच प्रकारचा असावा”, चहलच्या खेळण्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर उपस्थित केला प्रश्न

चहल-नटराजनची जोडी नंबर- १! पहिल्या टी२० मध्ये नोंदवला खास विक्रम

काय पायगुण आहे राव! ‘हा’ खेळाडू संघात असताना मागील २० सामन्यांत भारताने मिळवलाय विजय

ट्रेंडिंग लेख-

मराठीत माहिती- क्रिकेटर शिखर धवन

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी

…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---