वनडे मालिकेनंतर आता श्रीलंका आणि भारत संघ ३ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. रविवार रोजी (२५ जुलै) कोलंबो येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता या मालिकेतील पहिला टी२० सामना खेळला जाणार आहे. वनडेप्रमाणे टी२०तही पाहुण्या भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे शिखर धवन याच्या हाती असतील. यासह धवन हा टी२० स्वरुपात भारताचे प्रतिनिधित्व करणारा सातवा क्रिकेटपटू ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या सर्वात छोट्या स्वरुपात भारताने आतापर्यंत केवळ ७ वेळा कर्णधार बदलले आहेत. सर्वप्रथम माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने टी२० स्वरुपात भारताचे नेत्तृत्त्व केले होते. २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध केवळ एकाच टी२० सामन्यात तो भारतीय संघाच्या कर्णधाराच्या भूमिकेत होता. सेहवागनंतर भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी याने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने २००७ ते २०१६ या काळात सर्वाधिक ७२ सामन्यात भारतीय टी२० संघाचे नेतृत्त्व केले होते.
वर्ष २०१० मध्ये भारताला झिम्बाब्वेविरुद्ध टी२० मालिका खेळायची होती. काही कारणास्तव धोनी या मालिकेसाठी अनुपस्थित होता. त्यामुळे सुरेश रैनाने या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाची कमान सांभाळत संघाला तिनही सामने जिंकून दिले होते. रैनाप्रमाणेच अजिंक्य रहाणेलाही २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध २ टी२० सामन्यांमध्ये संघाचा प्रभारी कर्णधार म्हणून निवडण्यात आले होते.
अखेर धोनीने टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडल्यानंतर २०१७ साली विराट कोहलीला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. तेव्हापासून ते आतापर्यंत कोहलीच भारताच्या टी२० संघाचा संघाचा कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत एकूण ४५ टी२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व केले असून २७ सामने जिंकले आहेत. दरम्यानच्या काळात उपकर्णधार रोहित शर्मा यालाही नेतृत्त्वपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. तो भारतीय टी२० संघाचे नेतृत्त्व करणारा सहावा कर्णधार आहे.
भारतीय टी२० संघाचे कर्णधार
विरेंद्र सेहवाग (२००६-०६): १ टी२० सामना
एमएस धोनी (२००७-१६): ७२ टी२० सामना
सुरेश रैना (२०१०-११): ३ टी२० सामने
अजिंक्य रहाणे (२०१५-१५): २ टी२० सामने
विराट कोहली (२०१७-२१): ४५ टी२० सामने
रोहित शर्मा (२०१७-२०): १९ टी२० सामने
महत्त्वाच्या बातम्या-
इशारे तेरे..! भारताचा धुरंधर इशान किशनचे डोळ्यांचे इशारे पाहिले का? करतील तुम्हालाही घायाळ
गोड बातमी! नव्या वर्षाचा आनंद होणार द्विगुणित, भारताच्या ‘या’ त्रिशतकवीराच्या घरी हालणार पाळणार
शास्त्रींच्या ‘राइट हँड’चे भारतीय संघात पुनरागमन, प्रशिक्षकाने ‘असे’ केले आपल्या मित्राचे स्वागत