दुबई | आयपीएलच्या 13 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघ उत्कृष्ट कामगिरी करत आहे. गुणतालिकेत हा संघ मुंबई इंडियन्सपाठोपाठ दुसऱ्या स्थानी आहे. संघातील सर्व खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहेत. मात्र या हंगामात दिल्लीने अद्यापही सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले नाही असे दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांनी म्हटले आहे.
समोर काय होईल याचा करत नाही विचार
संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना पॉंटिंग म्हणाले, “या हंगामात आतापर्यंत सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडत आहे. परंतु मी समोर काय होईल याचा विचार करत नाही. आयपीएलध्ये कोणत्याही क्षणी उलटफेर होऊ शकतो. आम्ही यापूर्वीही पाहिलेले आहे की संघाने त्यांचे सर्व सहा सामने जिंकले परंतु तरीही तो संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. म्हणून आम्ही या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवू. मला वाटते की आम्ही कदाचित आठपैकी सहा सामने जिंकले असतील परंतु आम्ही अद्याप सर्वोत्कृष्ट खेळ खेळलेला नाही.”
दुसऱ्या डावात करावे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन
“दुसऱ्या डावात मी आपल्या खेळाडूंना सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगत आहे. स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच मी एक गोष्ट सांगत आहे की खेळाडूंनी पहिल्या डावात चांगले प्रदर्शन केले नाही तरी दुसऱ्या डावात सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळावे अशी माझी इच्छा आहे.” असेही पुढे बोलताना पॉंटिंग म्हणाले
चेन्नई सर्वोत्कृष्ट संघ
दिल्लीचा पुढील सामना शनिवारी (17 ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सशी होईल. चेन्नईला भेडसावणाऱ्या आव्हानांविषयी पॉन्टिंग म्हणाला, “आम्ही प्रत्येक संघाविरूद्ध सामने खेळले आहे. राजस्थानबरोबर आम्ही दोन सामने खेळले आहेत. चेन्नईशी होणारा हा आमचा दुसरा सामना असेल. आपण या स्पर्धेत कोणत्याही संघाला कमी लेखू शकत नाही. चेन्नई आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट संघ आहे. हे त्या संघाने सिद्ध केल आहे. ज्या संघात दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉटसन, धोनी, जडेजा आणि फाफ डु प्लेसिस असतील त्या संघाला तुम्ही हलक्यात घेऊ शकत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
-अशा पद्धतीने खेळाडूंना बाद न करण्याची रिकी पाँटिंगने दिली होती ‘या’ खेळाडूला ताकीद
–सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्सने ‘या’ दिग्गजाला वाहिली श्रद्धांजली
-दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी; ‘या’ खेळाडूची दुखापत झाली कमी
ट्रेंडिंग लेख-
-चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी
-सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार
-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली