पाकिस्तान संघाचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याला आपल्या काळात ‘स्विंग गोलंदाजीचा किंग’ म्हटले जायचे. आपल्या रिव्हर्स स्विंग गोलंदाजीने तो भल्याभल्या फलंदाजांची दांडी गुल करायचा. तसेच आजही त्याच्या गोलंदाजीचे कौतुक केले जाते. कौतुक करणाऱ्यांमध्ये आता आर अश्विनचा देखील समावेश झाला आहे. त्याने अक्रमचा एक व्हिडिओ शेअर करत त्याच्या गोलंदाजीची प्रशंसा केली आहे.
भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने ‘स्विंग गोलंदाजीचा किंग’ वसीम अक्रम याला टॅग केले आहे. हा व्हिडिओ पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचा आहे. या व्हिडिओमध्ये वसीम अक्रम आपल्या स्विंग गोलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. मुख्य बाब म्हणजे तो ४४ व्या षटकात गोलंदाजी करत होता. तरीही त्याने आपल्या धारदार स्विंग गोलंदाजीने फलंदाजांना गुंतवून ठेवले होते.
या व्हिडिओला २० हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे. या ट्विटला क२प्शन देताना अश्विनने लिहिले की, “हॅलो, पांढरा चेंडू!! आता तुम्ही कुठे आहात? हे ४४ वे षटक आहे. अशी स्विंग गोलंदाजी तर फक्त स्विंगचा सुलतान वसीम अक्रमच करू शकतो.”
Hello white ball ????????!! Where are you these days?? That’s the 44 th over and reverse swing at it’s best from the king @wasimakramlive ???????? https://t.co/PcgXEtOkwj
— Ashwin ???????? (@ashwinravi99) May 15, 2021
यात काहीच शंका नाही की वसीम अक्रमने आपल्या काळात गोलंदाजीमध्ये दबदबा निर्माण केला होता. तसेच आर अश्विन देखील कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीने फलंदाजांचा घाम फोडला आहे. अश्विनने आतापर्यंत एकूण ७८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ४०९ गडी बाद करण्यात यश आले आहे. सोबतच त्याला १९ वेळेस ४ पेक्षा अधिक गडी बाद करण्यात यश आले आहे. तर ३० वेळेस त्याने ५ पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत. यात ५९ धावा खर्च करत ७ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
डॉट, नो शॉट अँड आऊट; जेव्हा मॅकग्राच्या पहिल्याच षटकात भारतीय फलंदाजांची झाली होती दयनीय अवस्था
क्रिकेटचे मैदान गाजवायला सज्ज झाला मोहम्मद शमीचा भाऊ, पहा धारदार गोलंदाजीचा व्हिडिओ
पृथ्वी शॉची फलंदाजी पाहून माजी भारतीय क्रिकेटपटू झाला भलताच खुश; केली ‘ही’ मागणी






