यावर्षी आयसीसी वनडे विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ तयारी करत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ खेळाडूंच्या प्रदर्शनावर नजर ठेवून आहे, जेणेकरून त्यांना विश्वचषकासाठी संघ निवडता येईल. पण त्याआधीच भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर याने विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघ निवडला आहे. विशेष म्हणजे जाफरने या संघात शिखर धवन याची निवड केली आहे.
जिओ सिनेमावर चर्चा करताना वसीम जाफर (Wasim Jaffer) याने वनडे विश्वचषक 2023 (ODI WC 2023) साठी 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड केली. संघात जाफरने तीन सलामीवीर फलंदाजांना संधी दिली आहे. यात रोहित शर्मा, शिखर धवन आणि शुबमन गिल यांची नावे आहेत. “मी तीन सलामीवीर निवडले आहेत. शिखर धवन (Shikhar Dhawan) खेळणार नसला, तरीही मी त्याला संघात घेतलं आहे. मी संघात पर्यायी सलामीवीर म्हणून त्याला घेतलं आहे.”
मध्यक्रम आणि फिरकी गोलंदाजांविषयी जाफर म्हणाला, “विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, यात काहीच शंका नाही. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर, केएल राहुल पाचव्या क्रमांकावर आणि हार्दिक पंड्या 6व्या क्रमांकावर खेळेल. यानंतर तीन फिरकीपटू रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव खेळतील.”
“विश्वचषकासाठी माझ्या संघात जसप्रीत बुमराह असेल, तसेच त्याच्या साथीला शमी किंवा सिराजला घेईल. मी दोन वेगवान गोलंदाजांना खेळवेल, सिराज आणि बुमराहला. माझ्या दृष्टीने हार्दिक पंड्याने गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण विश्वचषक भारतात आहे अशात संघात तीन फिरकीपटू पाहिजेत,” असेही जाफर पुढे म्हणाला.
वनडे विश्वचषक 2023साठी वसीम जाफरने निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, संजू सैमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर. (Wasim Jaffer gave chance to Shikhar Dhavan in the squad for the ODI World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
ईशानने सांगितले चौथ्या क्रमांकावर खेळण्याचं कारण! कर्णधार-प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून नाही, तर स्वतः…
कुंबळे-हरभजनच्या विक्रमाला धक्का! अश्विन बनला भारताचा दुसरा सर्वोत्तम गोलंदाज