न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंड दौर्यावर असून उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्डसच्या मैदानावर नुकताच पार पडला. हा पाचव्या दिवशी पर्यंत खेळ होऊन देखील हा सामना मात्र अनिर्णीत अवस्थेतच संपला.
शेवटच्या दिवशी इंग्लंडला पाहुण्या न्यूझीलंड संघाने २७३ धावांचे आव्हान दिले होते. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करतांना इंग्लंडने केवळ ३ बाद १७० धावाच केल्या. त्यामुळे हा सामना अनिर्णित अवस्थेतच संपुष्टात आला. यानंतर भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरने भन्नाट मिम शेअर करत इंग्लंडची खिल्ली उडवली.
‘क्या गुंडा बनेगा रे तू?’
खरंतर न्यूझीलंडने इंग्लंडला २७३ धावांचे आव्हान दिले होते, त्यावेळी यजमान इंग्लंड संघ धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करेल असेच सगळ्यांना वाटले होते. विशेषतः काहीच महिन्यांपूर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात चौथ्या डावात असाच ३२८ धावांचा पाठलाग करून वस्तुपाठ घालून दिला होता. यावेळी तर इंग्लंड मायदेशात खेळत होता आणि त्यांना जिंकण्यासाठी चार पेक्षाही कमी धावगतीने धावा करायच्या होत्या. मात्र इंग्लंडने जिंकण्याचा प्रयत्न देखील केला नाही. याउलट त्यांनी सामना अनिर्णित राखण्यासाठीच प्रयत्न केला.
यावरूनच वसीम जाफरने आता त्यांची खिल्ली उडवली आहे. त्याने ट्विट करत लिहिले की, ‘जर तुम्ही मायदेशात खेळत असतांना देखील, अपेक्षित धावगती ३.६ असतांना आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणांचा प्रश्न नसतांना देखील धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करणार नसाल, तर कधी करणार आहात? कसोटी क्रिकेटसाठी हे चांगले चिन्ह नाही.’ या शब्दांत जाफरने आपली नाराजी व्यक्त केली आहे. यासह त्याने ‘क्या गुंडा बनेगा रे तू’, अशी कॅप्शन असलेला मिम देखील शेअर केला आहे.
If you won't even try to chase a target of 3.6 an over at home with no WTC points at stake, when will you ever try? Not a good advert for test cricket😴 #EngvNZ@ECB_cricket pic.twitter.com/K4qzAhoe7L
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) June 6, 2021
दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना झाला असून आता दुसरा सामना १० जूनपासून खेळवला जाणार आहे. हा सामना बर्मिंगहॅम येथील एजबस्टनच्या मैदानावर खेळवला जाईल.
महत्वाच्या बातम्या:
असं कोण रेनकोट घालतं! लॉर्ड्स कसोटीत दर्शकाची भलतीच कृती, दर्शकांसह समालोचकही लोटपोट
माजी ऑसी दिग्गजाने निवडले जगातील ५ सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बुमराहला नाही दिली जागा
‘तो भारताचा थ्रीडी खेळाडू, त्याला संघाबाहेर करणं कठीण’; पाकिस्तानी खेळाडूकडून स्तुती