इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. २६ मार्चपासून चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने या हंगामाची सुरुवात होणार आहे. या उद्घाटन सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी याने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला आहे. यादरम्यान त्याला एका चाहत्याने गमतीशीर प्रश्न विचारला, ज्यावर त्यानेही मजेशीर उत्तर दिले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके, CSK) संघाने आयपीएल १५ ची सुरुवात होण्यापूर्वी एक कार्यक्रम आयोजित केले आहे, ज्यामध्ये धोनी (MS Dhoni) चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसला आहे. यादरम्यान चाहत्याने त्याला थोडा वैयक्तिक प्रश्न विचारला, ज्यावर धोनीने आपल्या उत्तराने (MS Dhoni Hilarious Reply) मैफील लुटली. त्याच्या या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
चाहता धोनीला विचारतो की, ‘सर्वांना माहिती आहे की, तू नंबर १ आहेस. पण जेव्हा तू रात्री घरी जातोस, तेव्हा तिथे कोण नंबर १ असतं?’
चाहत्याच्या या मजेशीर प्रश्नावर तसेच उत्तर देत धोनी म्हणतो की, ‘तुम्ही तुमच्या मागे वळून पाहा, अर्ध्यापेक्षा जास्त लोक आता हसत असतील. सर्वांना माहिती आहे की, घरी गेल्यानंतर फक्त पत्नीच नंबर १ असते.’ यानंतर सर्वत्र हशा पिकला.
https://www.instagram.com/reel/CbK_eukAaCA/?utm_source=ig_web_copy_link
चेन्नई आणि कोलकाता संघाची आमने सामने कामगिरी
दरम्यान उभय संघांची आमने सामने कामगिरी (CSK vs KKR Head To Head Records) पाहायची झाल्यास, आतापर्यंत चेन्नई आणि कोलकाता (CSK vs KKR) संघांमध्ये २६ सामने झाले आहेत. त्यापैकी १७ सामन्यांमध्ये चेन्नईने बाजी मारली आहे. तर कोलकाता संघाला ८ सामने जिंकण्यात यश आले आहे. दोन्ही संघातील एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघ – रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, दीपक चाहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, ड्वेन ब्राव्हो, डेवॉन कॉनवे, शुभ्रांशू सेनापती, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महिश तिक्षणा, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, प्रशांत सोळंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा, मुकेश चौधरी, सिमरनजीत सिंग
कोलकाता नाईट रायडर्स संघ – आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, पॅट कमिन्स, नितीश राणा, श्रेयस अय्यर, शिवम मावी, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, रसिक दार, बाबा इंद्रजित, चमिका करुणारत्ने, अभिजित तोमर, प्रथम सिंग, अशोक शर्मा, सॅम बिलिंग्ज, ऍलेक्स हेल्स, चीम साऊथी, रमेश कुमार, उमेश यादव, मोहम्मद नबी, अमन खान
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुझ्या आयुष्यात दुसरं कुणी आहे का?’, अश्विनला चहलचा प्रश्न; वाचा काय आहे भानगड
‘यंदा आमचे प्रदर्शन जोरदार दिसेल, आमच्याकडे खूप सक्षम संघ’, राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकाची हुंकार
कसोटीतही आक्रमक फलंदाजी करणारे तीन फलंदाज, ज्यांनी सलग ४ चेंडूंवर ठोकलेत ४ षटकार