fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

इंदोरमध्ये विराट कोहली खेळतोय गल्ली क्रिकेट; पहा व्हिडिओ

गुरुवारपासून (14 नोव्हेंबर) होळकर क्रिकेट स्टेडियम (Holkar Cricket Stadium), इंदोर (Indore) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील पहिल्या कसोटी सामन्याला (Test Match) सुरुवात होत आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहली भारतीय संघातील खेळाडूंबरोबर नव्हे तर इंदोरमधील लहान मुलांबरोबर गल्ली क्रिकेट खेळताना दिसून आला आहे.

इंटरनेटवर सध्या हा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट इंदोरमध्ये लहान मुलांबरोबर गल्ली क्रिकेट (Gully Cricket) खेळताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये विराट लहान मुलांबरोबर क्रिकेट खेळण्यासोबतच मस्ती करतानाही दिसतोय.

भारत विरुद्ध बांगलादेश संघात नुकत्यात झालेल्या 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 (International Cricket) मालिकेसाठी विराटला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्याऐवजी या टी20 मालिकेत रोहित शर्माने भारताचे नेतृत्व केले होते.

पण आता बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो पुन्हा भारतीय संघाशी जोडला गेला असून कसोटी मालिकेत विराटच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान कोलकातामध्ये होणार आहे. हा भारतातील पहिला दिवस- रात्र कसोटी सामना असणार आहे.

You might also like