एमएस धोनीचा तो कूल विक्रम धोक्यात, वृद्धीमान साहा करु शकतो हा पराक्रम

आजपासून(14 नोव्हेंबर)  भारत विरुद्ध बांगलादेश संघात (India vs Bangladesh) 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाला (Wriddhiman Saha) भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) एक खास विक्रम मोडण्याची संधी आहे.

साहाने बांगलादेशविरुद्धच्या या कसोटी मालिकेत जर यष्टीमागे 9 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो धोनीला मागे टाकत बांगलादेश विरुद्ध कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय यष्टीरक्षक ठरले.

धोनीने बांगलादेश विरुद्ध कसोटीमध्ये 3 सामन्यात यष्टीमागे 15 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याच्या 12 झेल आणि 3 यष्टीचीत विकेट्सचा समावेश आहे.

तसेच सध्या साहाने बांगलादेश विरुद्ध आत्तापर्यंत 2 कसोटी सामन्यात यष्टीमागे 7 विकेट्स घेतल्या आहेत. तो बांगलादेश विरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांच्या यादीत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या धोनीपाठोपाठ दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने बांगलादेश विरुद्ध यष्टीमागे 12 विकेट्स घेतल्या आहेत.

बांगलादेश विरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय यष्टीरक्षक –

15 विकेट्स – एमएस धोनी (12 झेल –  3 यष्टीचीत)

12 विकेट्स – दिनेश कार्तिक (11 झेल – 1 यष्टीचीत )

7 विकेट्स – वृद्धीमान साहा (5 झेल – 2 यष्टीचीत)

1 विकेट्स – सबा करिम (1 झेल)

You might also like