अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने धमाका केला आणि अशी खेळी खेळली ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. मॅक्सवेलने 128 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकारांसह 201 धावांची नाबाद खेळी खेळली. मॅक्सवेलने 157.03 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. एकदिवसीय विश्वचषकात द्विशतक झळकावणारा मॅक्सवेल जगातील तिसरा फलंदाज ठरला. मॅक्सवेलला त्याच्या खेळी दरम्यान दुखापत झाली होती परंतु त्याने हिंमत हारली नाही आणि एक अशी खेळी खेळली जी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अनोखी आणि संस्मरणीय खेळी ठरली.
दुखापत झाली असतानाही ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) क्रीजवर राहिला आणि त्याने अफगाण गोलंदाजांचा जोरदार सामना केला. मॅक्सवेलने त्याच्या खेळीदरम्यान असे अनेक फटके मारले ज्याने सर्वांनाच चकित केले. मॅक्सवेलने मैदानावर उभे राहून चौकार आणि षटकार मारत इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठी खेळी करणारा मॅक्सवेल फलंदाज ठरला आहे.
“ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजीवेळी मॅक्सवेल फलंदाजी करताना सामन्यातील 47व्या षटकात त्याने चक्रीवादळ आल्यासारखं वादळ आणलं होतं. मुजीब उर रहमान याच्या या षटकात त्याने तब्बल 22 धावा कुटल्या, त्याने या षटकात तीन जबरदस्त षटकार आणि एक चौकार मारला. याच षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने संघाला विजय मिळवून दिला.”
या विजयासह ऑस्ट्रेलियाने विश्वचषक 2023 मधील सहावा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया संघ 12 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्याचबरोबर त्यांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही प्रवेश केला आहे. (Watch what Maxwell wore in the match against Afghanistan exactly what happened)
म्हत्वाच्या बातम्या
एकच फाईट वातावरण टाईट! मॅड मॅक्सने 201 धावा करताच बनले 5 World Record, मोडणे खूपच कठीण
मॅक्सवेलच्या खेळीवर आख्खं जग झालं व्यक्त, पण विराटच्या रिऍक्शनने वेधलं लक्ष; म्हणाला, ‘फक्त तूच…’