---Advertisement---

‘आम्ही एकमेकांशिवाय अपूर्ण…’, मालिकावीर अश्विन-जड्डूने गायले एकमेकांचे गुणगान, तुम्हीही कराल कौतुक

On: सोमवार, मार्च 13, 2023 6:50 PM
R-Ashwin-And-Ravindra-Jadeja
---Advertisement---

भारतीय अनुभवी गोलंदाज आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत दमदार प्रदर्शन केले. त्यांनी खास कामगिरी करत सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. या दोघांनीही ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजांना अक्षरश: घाम फोडला. अहमदाबाद येथील चौथा कसोटी सामना अनिर्णित ठरला. मात्र, मालिका भारताने 2-1ने जिंकली. चौथ्या कसोटीनंतर दोन्ही खेळाडूंना मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार पटकावताच दोघांनीही एमकेकांची प्रशंसा केली. यामधूनही त्यांनी सर्वांची मने जिंकली.

अश्विनने केले जडेजाचे कौतुक
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर चौथा कसोटी सामना संपल्यानंतर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा (R Ashwin And Ravindra Jadeja) यांना ‘मालिकावीर’ पुरस्कार मिळाला. यानंतर अश्विनने जडेजाचे कौतुक केले. तो म्हणाला की, “ही एक शानदार मालिका राहिली आहे. मी आणि जडेजाने अनेक वर्षांपूर्वी सुरुवात केली होती, पण आम्ही एकमेकांशिवाय इतक परिणामकारक ठरत नाहीत. मी मागील 2-3वर्षांमध्ये खूप प्रसिद्धी मिळवली. तो मला चेंडूसोबतच रचनात्मक होण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतो. याचे श्रेय त्यालाच जाते. मला वाटले की, आम्ही दिल्ली कसोटीतही चांगली गोलंदाजी केली. त्यामुळेच आज आम्हाला संधी मिळाली.”

“जड्डू नेहमीच बेफिकीर असतो. जे काही होते, त्याबाबत तो चिंता करत नाही. मात्र, काल बाद झाल्यानंतर तो एक तास ड्रेसिंग रूममध्ये बसून राहिला. आम्ही खूप चर्चा करतो. मागील 2-3 वर्षांमध्ये हा खास करून जास्त बदलला आहे. या मालिकेत आम्ही अनेकदा हेड आणि ख्वाजाच्या फलंदाजीवेळी बरीच चर्चा केली होती.”

जडेजानेही गायले अश्विनचे गुणगान
अश्विनसोबत मालिकावीर पुरस्कार शेअर करणाऱ्या जडेजानेही त्याचे गुणगान गायले. तो म्हणाला की, “अश्विनसोबत गोलंदाजी करण्यास खूप आवडते. तो सांगत राहतो की, कुठे गोलंदाजी केली पाहिजे किंवा कुठल्या विशेष फलंदाजाला कशी गोलंदाजी केली पाहिजे. मी या मालिकेत माझ्या फलंदाजीने खुश नाहीये. मी काही ठिकाणी चुकलो आणि चांगली फलंदाजी करू शकलो नाही. मी आणखी मेहनत करेल आणि माझ्या फलंदाजीवर लक्ष देईल. अश्विनकडे क्रिकेटचे चांगले ज्ञान आहे. त्याला जगातील प्रत्येक संघ आणि खेळल्या जात असलेल्या प्रत्येक मालिकेबद्दल माहिती आहे.”

अश्विन-जडेजाची कारनामा
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या या कसोटी मालिकेत भारताने 2-1ने विजय मिळवला. भारताच्या या विजयात अश्विन आणि जडेजाचे मोलाचे योगदान राहिले. त्यांनी जबरदस्त गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. तसेच, दुसरा सामना संघाने 6 विकेट्सने नावावर केला.

तसेच, तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवला. चौथा कसोटी सामना मात्र अनिर्णित राहिला. याव्यतिरिक्त अश्विन आणि जडेजाने मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान मिळवला. अव्वल स्थानी असलेल्या अश्विनने सर्वाधिक 25 विकेट्स, तर जडेजाने 22 विकटे्स घेत दुसरे स्थान पटकावले. (we are incomplete without each other after winning the player of the series ashwin jadeja won hearts with this statement)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ही दोस्ती तुटायची नाय! BGT मालिका विजयानंतर रोहितकडून विराटचे कौतुक; म्हणाला, ‘आम्ही त्याच्यामुळेच…’
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसह खास पुरस्कारांवर भारतीयांचेच नाव; विराट सामनावीर, तर ‘हे’ दोघे बनले मालिकावीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---