जागतिक क्रिकेट गाजवणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये भारतीय संघाचे धुरंधर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नावाचाही समावेश होतो. या दोन दिग्गजांनी आपल्या कारकीर्दीत एकापेक्षा एक विक्रम नावावर केले आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. तसेच, वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके ठोकण्याचा विक्रम ‘हिटमॅन’च्या नावावर आहे.
अनेकदा विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli And Rohit Sharma) यांच्यात सर्वोत्तम कोण, याची चर्चा होते. त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींवरून त्यांची एकमेकांशी तुलना केली जाते. अशातच विराट आणि रोहितपैकी तुझ्यासाठी सर्वात मौल्यवान विकेट कोणाची? हा प्रश्न वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू काईल मेयर्स (Kyle Mayers) याला विचारण्यात आला. यावेळी त्याने क्षणाचाही विलंब न लावता विराट कोहली (Virat Kohli) याचे नाव घेतले. तसेच, त्याला तिन्ही क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम खेळाडू म्हटले.
रोहित-विराटमध्ये सर्वोत्तम कोण?
काईल मेयर्स याने फॅनकोडवर अपलोड केलेल्या व्हिडिओत चर्चा करताना विराट कोहली याला तिन्ही क्रिकेट प्रकारातील दिग्गज फलंदाज म्हटले. मेयर्स म्हणाला की, “जगातील कोणत्याही गोलंदाजाला विराट कोहलीला बाद करावे वाटेल.” खरं तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तसेच, वनडे मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यातही विराट आणि रोहित विश्रांती करताना दिसले होते.
Kyle Mayers on Kohli vs Rohit and aggression in the game. BTW, this is only on FanCode 😉#INDvWIAdFreeonFanCode #WIvIND pic.twitter.com/6Ziq45oXJp
— FanCode (@FanCode) August 5, 2023
विराटची जबरदस्त आकडेवारी
विराट कोहली याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द भुवया उंचावणारी राहिली आहे. त्याने भारताकडून आतापर्यंत 111 कसोटी सामन्यात 49.3च्या सरासरीने 8676 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून कसोटीत 29 शतके आणि 29 अर्धशतकांचा पाऊस पडला आहे. तसेच, वनडेत त्याने 275 सामने खेळताना 57.32च्या सरासरीने 12898 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावावर 46 शतकांचा समावेश आहे. तसेच, त्याने 65 अर्धशतकेही ठोकली आहेत. याव्यतिरिक्त टी20 क्रिकेटमध्ये त्याने 115 सामने खेळताना 52.74च्या सरासरीने 4008 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 37 अर्धशतकांचाही पाऊस पाडला आहे. (west indies star player kyle mayers tells who is best and better batsman in virat kohli and rohit sharma know here)
महत्त्वाच्या बातम्या-
पीसीबीचा ऐतिहासिक निर्णय! पाकिस्तानी खेळाडूंचा पगार चार पटींनी वाढणार, ‘हे’ स्टार क्रिकेटर होणार मालामाल
‘या’ स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार पाकिस्तानचे निवृत्त खेळाडू, अनेक दिग्गजांचा असणार समावेश