---Advertisement---

अखेर दुबईहून परतलेल्या व प्रचंड संकटात सापडलेल्या रैनाला घ्यावी लागली पोलीसांची मदत

---Advertisement---

१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएल २०२० ला सुरुवात होणार आहे. पण आयपीएलला सुरुवात होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख फलंदाज सुरेश रैना आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याने वैयक्तिक कारणामुळे आयपीएल२०२०मधून माघार घेतली आहे. त्याच्या या निर्णायानंतर एक मोठी बातमी समोर आली की पठाणकोट येथे त्याच्या आत्याच्या कुटुंबावर प्राणघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्याच्या आत्याच्या पतीचे निधन झाले. तर अन्य कुटुंबिय गंभीर जखमी झाले. याबाबतीत आता स्वत: रैनाने ट्विट करत पंजाब पोलिसांकडे मदत मागितली आहे.

त्याने ट्विट केले आहे की ‘पंजाबमध्ये माझ्या कुटुंबियांसमवेत जे झाले ते भयावह होते. माझ्या मामांचा( आत्याचे पती) मारण्यात आले. माझ्या आत्याला आणि माझ्या दोन्ही आतेभावांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. दुर्दैवाने माझ्या एका भावाचे काल रात्री जीवन जगण्यासाठी धडपडत असताना निधन झाले. माझी आत्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे.’

रैनाने पुढे म्हटले आहे, ‘आजही आम्हाला माहित नाही की त्या रात्री काय झाले आणि कोणी हे केले. मी पंजाब पोलिसांना विनंती करतो की त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. निदान आम्हाला हे कळायला हवे की भयंकर कृत्य कोणी केले. त्या गुन्हेगारांना अधिक गुन्हेगारी करण्यापासून थांबवले पाहिजे.’

हा हल्ला पठाणकोटमधील थरियाग गावातील रैनाच्या आत्याच्या कुटुंबावर १९ ऑगस्टच्या रात्री झाला, त्यावेळी कुटुंबातील सदस्य त्यांच्या घराच्या टेरेसवर झोपले होते. तेव्हा काही अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक शस्त्रांसह हल्ला केला होता. या घटनेमुळे रैना आयपीएलमधून परतल्याचाही अंदाज अनेकांनी लावला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

मला असं म्हणायचं नव्हतं, रैनाबद्दल मी जे बोललो ते नक्कीच…

डिप्रेशनमुळे १२ महिने क्रिकेट न खेळलेल्या क्रिकेटरने केले जबरदस्त फटकेबाजी

…म्हणून कुलदीप यादव कसोटी पदार्पणावेळी विराटला पहाटे ३ वाजता उठवणार होता

ट्रेंडिंग लेख –

एक नाही दोन नाही आख्खा संघच ठरला होता मॅन ऑफ द मॅच, पण कसे ते घ्या जाणून

भारतीय ३ विकेटकिपर, जे आयपीएलमध्ये ठरलेत सुपर किंग

तुटपूंज्या किंमत मिळूनही ‘हे’ ५ खेळाडू ठरले आयपीएलमध्ये सुपर डुपर हिट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---