कोरोना व्हायरसमुळे जगभरात सर्वकाही लाॅकडाऊन झालं आहे. सर्वच जण घरात आहेत. मोठे मोठे खेळाडू घरात बसून जनतेला संदेश देत आहेत. घरात बसण्यास सांगत आहेत. काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडू अभिलाषा म्हात्रे-पाटील यांनी आपल्या कुटुंबासोबत एक संकल्प केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर जनजागृती संदेश देताना अभिलाषा म्हात्रे-पाटील यांनी सांगितले की, “कोरोना व्हायरसचे मोठे संकट देशावर आले आहे. त्याबाबत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेताना सर्वांना हात जोडून विनंती केली आहे. या विनंतीला मान देत मी व माझ्या कुटूंबाने असा संकल्प केला आहे की घरातुन बाहेर जाण्याचे सर्व दरवाजे बंद असतील, जेव्हा जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूची गरज असेल तेव्हा घराबाहेर जायचं. तुम्ही सर्वांनी पण आपल्या घरच्यांसाठी व देशासाठी असा संकल्प करा.”
https://www.instagram.com/tv/B-KsC1tnXho/?utm_source=ig_web_copy_link
अभिलाषाम्हात्रे-पाटील यांनी आपल्या परिवारासोबत सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत “निरोगी राहा, सुरक्षित राहा, घरीच राहा” असा सर्वांना संदेश दिला.
अभिलाषा म्हात्रे-पाटील भारतीय कबड्डी महिला संघाच्या माजी कर्णधार आहेत. अर्जुन पुरस्कार विजेत्या अभिलाषा म्हात्रे ह्या आशियाई गेम्स सुवर्णपदक विजेत्या, विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या कबड्डीपटू आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-एवढं चांगलं खेळणाऱ्या श्रेयस अय्यरची ही इच्छा कधी पुर्ण होणार
-आफ्रिदीने कामच असं केलं की भज्जीला कराव लागलं कौतूक
-जगातील पहिली क्रिकेट टीम, जी देणार आपला अर्धा पगार कोरोना बाधितांना