डेविड वॉर्नर पुढच्या वर्षी क्रिकेटव्यतिरिक्त काही महत्वाच्या गोष्टी करणार असल्याचे समोर आले आहेत. वॉर्नरने फॉक्स स्पोर्ट्ससोबथ एक करार केल्याचे समोर येत आहे. पण अद्याव याविषयी कुठचील अधिकृत माहिती समोर आली नाहीये. वॉर्नर पुठचे 12 महिने क्रिकेट खेळत राहणार आहे, पण त्यानंतर जर त्याने निवृत्ती घेतली, तर वॉर्नरचे पुढचे नियोजन काय असेल, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चाहत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर नेटफिल्स इंडियाकडून मिळाले.
डेविड वॉर्नर नुकताच फॉक्स स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला की, “मी फॉक्स क्रिकेटच्या टीममध्ये सामील होऊन आनंदी आहे. मी पुढच्या 12 महिन्यांमध्ये संघासोबत असले. मी खेळही सुरू ठेवणार आहे आणि एका असे वाटके की, आता मला कारकीर्द संपवायची आहे, तरीही हा खेळाचा भाग असणार आहे.” वॉर्नरच्या या वक्तव्यानंतर डेविड वॉर्नरच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशात नेटफ्लिक्स इंडियाने वॉर्नरला निवृत्तीनंतर एक काय केले पाहिजे, याचा सल्ला दिला आहे.
If David Warner retires from cricket, it's only apt that he begins starring in Telugu movies 🥺 https://t.co/VUxLIh8KUA
— Netflix India (@NetflixIndia) January 4, 2023
नेटफ्लिक्स इंडियाने वॉर्नरला निवृत्तीनंतर दाक्षिणात्या सिनेमांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला आहे. नेटफ्लिक्सचा हा प्लॅन ऐकल्यानंतर स्टार क्रिकेटपटू वॉर्नर देखील स्वतःचे हसू रोखू शकला नाही. नेटफ्लिक्सच्या या पोस्टवर वॉर्नरने खूप साऱ्या स्माईलीच्या इमोजी पोस्ट केल्या आहेत.
😂😂😂😂😂 https://t.co/d5739HLOAZ
— David Warner (@davidwarner31) January 5, 2023
दरम्यान, वॉर्नर इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी खूप मोठ्या काळापासून खेळत आला आहे. मात्र मागच्या आयपीएल हंगामात त्याने हैदराबाद संघाची साथ सोडील आणि दिल्ली कॅपिटल्स संघासोबत जोडला गेला. वॉर्नरला हैदराबादच्या चाहत्यांकडून मिळालेले प्रेम तो स्वतः देखील कधीच विसरू शकणार नाही. ही गोष्टी त्याने अनेकदा बोलूनही दाखवली आहे. त्याव्यतिरिक्त वॉर्नर दाक्षिणात्य चित्रपटांचा मोठा चाहता देखील आहे.
वॉर्नरच्या इंस्टाग्रामवर दाक्षिणात्या चित्रपटांची एक्टिंग आणि गाण्यांची भरमार आहे. याच कारणास्तव नेटफ्लिक्सने देखील त्याला या चित्रपटांमध्ये कारण करण्याचा सल्ला दिला. वॉर्नर आगामी आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनण्यासाठी प्रमुख दावेदार आहे. कारण त्यांचा नियमित कर्णधार रिषभ पंत याच्या गाडीचा अपघात झाला. अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली असून तो पुढचा मोठा काळ क्रिकेटच्या मैदानातून बाहेर राहणार आहे. (What will Warner do after retiring from cricket? Netflix gave great advice)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! विश्वचषकात खेळलेल्या दिग्गज खेळाडूचे निधन
डॅनी डॅनियल्सनेही घेतली पाकिस्तान संघाची फिरकी, समालोचकांकडून झाली मोठी चूक