---Advertisement---

केव्हा, कुठे आणि कधी रंगणार दक्षिण आफ्रिका-भारत दुसरा वनडे सामना; जाणून घ्या सर्वकाही

On: शुक्रवार, जानेवारी 21, 2022 12:10 PM
KL Rahul and Temba Bavuma
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता, तर मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (२१ जानेवारी ) पार पडणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी ‘करो या मरो’ सामना असणार आहे. कारण या सामन्यात पराभव झाला तर, भारतीय संघाला वनडे मालिका देखील गमवावी लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवण्याच्या दृष्टीने मैदानात उतरणार आहे.

पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. पहिल्या वनडे सामन्यात मध्यक्रमातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. तसेच सूर्यकुमार यादव असताना त्याने वेंकटेश अय्यरला या संघात स्थान दिले. परंतु, त्याला संघात स्थान देऊनही त्याच्याकडून गोलंदाजी करून घेतली नव्हती. वेंकटेश अय्यर हा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. चला तर पाहूया दुसरा वनडे सामना तुम्ही कुठे आणि कधी पाहू शकाल.

१. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना केव्हा खेळला जाणार आहे?
– दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना शुक्रवारी (२१ जानेवारी) पार पडणार आहे.

२. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना कुठे खेळला जाईल? 
– दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना पार्लच्या बोलॅंड पार्कमध्ये पार पडणार आहे.

३. किती वाजता सुरू होईल दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना?
– दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होईल आणि नाणेफेक दुपारी १:३० वाजता होईल.

४. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना लाईव्ह कुठे पाहू शकाल?
– दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहू शकता.

५. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही कुठे पाहू शकता? 
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही डिस्नी प्लस हॉटस्टार ऍपवर पाहू शकता. तसेच सामन्याचे महत्त्वाचे अपडेट तुम्ही http://www.mahasports.in वर मिळवू शकतात.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –

दक्षिण आफ्रिका – तेंबा बावुमा (कर्णधार), झुबेर हमझा, जानेमन मलान, ए़डेन मार्करम, डेव्हिड मिलर, रॅसी वॅन डर ड्युसेन, मार्को यान्सेन, वेन पार्नेल, अँडिले फेहलुक्वायो, ड्वेन प्रिटोरियस, क्विंटन डी कॉक, काइल वेरेन, केशव महाराज, सिसांडा मगाला, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, तब्राइझ शम्सी.

भारत – केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, रिषभ पंत, ईशान किशन, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी

महत्वाच्या बातम्या :

मोठा बातमीः भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने, याचवर्षी ‘या’ दिवशी खेळणार सामना

“…आता तरी ऋतुराजला संधी द्या”

हे नक्की पाहा:

अभ्यासू कीडा असलेला Axar Patel फक्त आज्जीमुळे बनला क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---