भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे की, जय शहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे म्हणजेच आयसीसीचे अध्यक्ष बनले तर त्याचा सर्वाधिक फायदा कोणाला होईल? ज्याप्रकारे त्यांनी भारतीय क्रिकेटचा विकास केला, त्याच पद्धतीने ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट वाढवतील आणि याचा फायदा पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना होईल, असा विश्वास सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला आहे.
सुनील गावस्कर यांनी स्पोर्टस्टारसाठी लिहलेल्या आर्टीकलमध्ये म्हटले आहे की, “जय शाह हे आयसीसीचे पुढील अध्यक्ष असतील अशी सर्व शक्यता आहे. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी ज्या प्रकारे काम केले आहे, त्याचा फायदा पुरुष आणि महिला खेळाडूंना होईल. गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट ज्या प्रकारे आकाराला आले आहे, त्यात बीसीसीआय आणि त्याच्या प्रशासनाचेही योगदान आहे. पुरुष आणि महिला दोन्ही संघ ज्याप्रकारचे क्रिकेट खेळत आहेत, तेही या खेळाचे भारतासाठी मोठे योगदान आहे. खेळाडू आणि व्यवस्थापन यांच्यातील टीमवर्कमुळे भारतीय क्रिकेट इतक्या सुदृढ स्थितीत असण्याचे कारण आहे”.
जय शाह हे सध्या बीसीसीआयचे सचिव आहेत. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. याचा थेट फायदा भारतीय क्रिकेटला झाला. बीसीसीआय आधीच पैशाच्या बाबतीत जागातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. आता ते जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या स्पोर्ट्स लीगचे मालक आहे. बीसीसीआयकडूनही खेळाडूंना भरपूर पैसे मिळत आहेत. आता नुकतेच बीसीसीआयकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सामनावीर आणि टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा-
जय शहांची मोठी घोषणा! देशांतर्गत स्पर्धेतील खेळाडूही होणार मालामाल
‘मी विराट भैय्यासोबत कधीच..’, रिंकू सिंगची किंग कोहलीबद्दल भावनिक प्रतिक्रिया
“यासाठी मी अग्नीपरीक्षा देखील देण्यास..”, पाहा टी20 कर्णधार सूर्या असं का म्हणाला?