ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यादरम्यान आजपासून ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील मनुका ओव्हल स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १६१ धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला २० षटकात ७ बाद १५० धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना ११ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाल्याने गोलंदाजीसाठी मैदानात उतरू शकला नाही. असे असले तरी याचा त्रास मात्र ऑस्ट्रेलियाला झाला.
फलंदाजी करताना झाला हॅमस्ट्रिंगचा त्रास
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना उपकर्णधार केएल राहुलच्या अर्धशतकाने भारताने १३ षटकात ९२ धावा काढल्या होत्या. राहुल बाद झाल्यानंतर जडेजा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. एकोणिसाव्या षटकात फलंदाजी करताना त्याला अचानक हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवू लागला. फिजिओने उपचार केल्यानंतर तो पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झाला. त्यानंतर, पुढील तीन चेंडूंवर त्याने षटकार व दोन चौकार ठोकत धावांचा वेग वाढवला.
अखेरच्या षटकात लागला हेल्मेटवर चेंडू
मिचेल स्टार्क टाकत असलेल्या भारताच्या डावातील अखेरच्या षटकातील दुसरा चेंडू जडेजाच्या बॅटची कड घेऊन त्याच्याच हेल्मेटवर लागला. त्या चेंडूवर मोझेस हेन्रीक्सने अलगद झेल सोडला. त्यावेळी, डोक्याला चेंडू लागूनही जडेजाला फारसा त्रास जाणवला नाही. जडेजाने त्या षटकात पुन्हा दोन चौकार लगावले व भारताची धावसंख्या १६१ पर्यंत नेली. जडेजा २३ चेंडूत ४३ धावा काढून नाबाद राहिला. ज्यात, पाच चौकार व एका षटकाराचा समावेश होता.
The incident where Jadeja got hit in the helmet.
Pretty big impact.#AUSvIND pic.twitter.com/v8LmGuwbAY
— Lachlan McKirdy (@LMcKirdy7) December 4, 2020
UPDATE: Ravindra Jadeja was hit on the helmet in the final over of the first innings of the first T20I.
Yuzvendra Chahal will take the field in the 2nd innings as a concussion substitute. Jadeja is currently being assessed by the BCCI Medical Team. #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/tdzZrHpA1H
— BCCI (@BCCI) December 4, 2020
कन्कशन नियमांमुळे चहल झाला अंतिम अकरामध्ये समाविष्ट
भारताचा डाव संपल्यानंतर जडेजाने कन्कशनसंबंधी तक्रार केली. त्याला चक्कर येण्यासारखे वाटत असल्याने, भारतीय संघ व्यवस्थापनाने सामनाधिकारी डेविड बून यांना कल्पना देऊन कन्कशन सब्टीट्यूट मागितला, ज्याला सामनाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. जडेजाचा बदली खेळाडू म्हणून फिरकीपटू युझवेंद्र चहल मैदानात उतरला. चहल ऑस्ट्रेलियासाठी त्रासदायक ठरला. त्याने आपल्यात चार षटकात तीन बळी मिळवत, सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावे केला.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या आव्हानाचा दिशेने कूच करणाऱ्या स्मिथचा सॅमसनने घेतला कठीण झेल, Video जोरदार व्हायरल
Video – सात वर्षाच्या चिमुरड्या भारतीय मिस्ट्री स्पिनरची गोलंदाजी पाहून तुम्हीही व्हाल आवाक्
भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नटराजनचा भावूक संदेश, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर