बिग बॅश लीगमध्ये सहभागी होण्यासाठी पोहचलेला अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू मुजीब उर रहमान कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याला सध्या गोल्ड कोल्ड या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. जिथे तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. बीबीएलमध्ये मुजीब उर रहमान हा ब्रिस्बेन हिट संघाकडून खेळतो.
मुजीब उर रहमानला कोरोनाची लागण
मुजीब उर रहमान मागच्या आठवड्यातचं आपल्या इतर साथीदारांसोबत बिग बॅश लीगसाठी भाग घ्यायला पोहचला होता. परंतु सुरुवातीलाच लक्षणं जाणवू लागल्याने त्याची चाचणी घेण्यात आली, ज्यामधे तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
त्याला जेव्हा कोरोना झाल्याचे आढळले, तेव्हा क्वीन्सलँड नियमानुसार दोन आठवड्यांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.
खेळाडूंची सुरक्षितता आणि आरोग्य आमची प्राथमिक जबाबदारी- बीबीएलचे प्रमुख ऍलिस्टर डोडसन
क्वीन्सलँडचे मुख्य टेरी सेवेंसन यांनी सांगितले, आम्ही या युवा खेळाडूवर लक्ष ठेवून आहोत आणि त्याची पूर्ण काळजी घेतली जात आहे. त्याचबरोबर आम्ही अधिकाऱ्यांसोबतही चर्चा करत आहोत. ज्यामध्ये खेळाडूला कोणतीही अडचण येणार नाही.
बिग बॅश लीगचे प्रमुख ऍलिस्टर डोडसन यांच्यानुसार, या हंगामात खेळाडूंची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य आमची प्राथमिक जबाबदारी आहे. मुजीब उर रहमान आणि ब्रिस्बेन हिट यांना आम्ही संपूर्ण सहकार्य करू. त्याचबरोबर आम्ही हे ही निश्चित करत आहोत की सर्व नियमांचे पालन केले जावे.
मुजीब उर रहमान हा यंदाच्या वर्षी बिग बॅश लीगमध्ये तिसरा हंगाम खेळत आहे. त्याची आतापर्यंत 18 सामन्यात 6.08 ची इकॉनाॅमी राहिली आहे. ही कामगिरी टी-20 क्रिकेटमध्ये खूपच जबरदस्त मानली जाते.
संदीप लामिछानेही आढळा होता कोरोना पॉझिटिव्ह
नेपाळचा युवा फिरकीपटू संदीप लामिछानेही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. अपेक्षा आहे की तो ख्रिसमसनंतर संघाचा भाग असेल. या दोन युवा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने बिग बॅश लीगवर चिंतेच सावट पसरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कमाल लाजवाब…! जगात फक्त तीन फलंदाजांना करता आलेला विक्रम केएल राहुलच्याही नावावर
नटराजनचा ऑस्ट्रेलियात डंका, केली बुमराहच्या विक्रमाची बरोबरी
भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नटराजनचा भावूक संदेश, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर