शनिवारी (दि. 29 जुलै) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसरा वनडे सामना बार्बाडोस येथे खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण, एकीकडे भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. अशात, भारत ही आघाडी कायम ठेवून मालिका नावावर करण्याचा प्रयत्न करेल, तर दुसरीकडे वेस्ट इंडिज संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असेल. वेस्ट इंडिजसाठी ही ‘करो या मरो’ सामना असेल. चला तर, दुसऱ्या सामन्याविषयी जाणून घेऊयात…
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील पहिल्या सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारताकडून कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चमकले होते. या दोघांनी मिळून 7 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, फलंदाजीत ईशान किशन (Ishan Kishan) चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाच्या फलंदाजी विभागाकडून धावांची अपेक्षा केली जाऊ शकते. दुसऱ्या वनडेत चांगली फलंदाजी करण्याचा वेस्ट इंडिजचाही प्रयत्न असेल. मात्र, या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे. वेस्ट इंडिज संघाला जास्त प्रयत्न करावे लागू शकतात.
खेळपट्टी आणि हवामान
बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानाची खेळपट्टी फिरकीपटूंना फायदेशीर ठरू शकते. कारण, पहिला सामनाही याच मैदानावर झाला होता आणि या सामन्यात फिरकीपटूंनी कमाल गोलंदाजी केली होती. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. हवामानाविषयी बोलायचं झालं, तर पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. सामन्यामध्ये पाऊस पडू शकतो.
सामन्याचे थेट प्रक्षेपण
भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. प्रेक्षक हा सामना जिओ सिनेमा ऍप आणि वेबसाईटवर लाईव्ह पाहू शकतात. तसेच, टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होईल.
दुसऱ्या वनडे सामन्यासाठी संभावित प्लेइंग इलेव्हन
वेस्ट इंडिज
ब्रेंडन किंग, एलिक अथानाजे, शाय होप (कर्णधार), केसी कार्टी, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, डोमिनिक ड्रेक्स, यानिक कारिया, गुडाकेश मोती, जेडेन सिल्स
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार. (wi vs ind 2nd odi match preview predicted eleven live streaming know here)
महत्त्वाच्या बातम्या-
ओव्हल कसोटीत ऑस्ट्रेलियाने मिळवली आघाडी, स्मिथसह कमिन्स आणि टॉड मर्फीचे महत्वपूर्ण योगदान
T10 सामन्यात युसूफ पठाणच्या बॅटने केला कहर! 41व्या वर्षी अवघ्या 26 चेंडूत ठोकल्या 80 धावा