---Advertisement---

अबब! आर्चरने इशान किशनचा घेतलेला झेल पाहून सगळ्यांच्याच बत्त्या झाल्या गुल

---Advertisement---

रविवारी (२५ ऑक्टोबर) अबु धाबी येथे राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स संघांनी आयपीएल २०२० च्या ४५ व्या सामन्यात एकमेकांचा सामना केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यादरम्यान शानदार फलंदाजी करत असलेला मुंबईचा धडाकेबाज फलंदाज ईशान किशन झेलबाद झाला. त्याचा हा झेल राजस्थानचा धिप्पाड खेळाडू जोफ्रा आर्चरने झेलला. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.

झाले असे की, मुंबईकडून डावाची सुरुवात क्विंटन डी कॉक आणि ईशान किशनने केली होती. परंतु पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर फलंदाज क्विंटन डी कॉक तंबूत परतला. त्यानंतर किशनने डाव सांभाळला आणि चांगली फटकेबाजी करायला सुरुवात केली. शानदार खेळी करत असलेल्या किशनने १२ व्या षटकातील ४था चेंडू बाऊंड्रीच्या दिशेने टोलवला. हे षटक कार्तिक त्यागी टाकत होता.

त्याचा फटका पाहून हा नक्कीच षटकार जाईल असे वाटले. परंतु तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या जोफ्रा आर्चरने आपल्या उंचीचा फायदा घेत उडी मारली तसेच एक हाताने अविश्वसनीय झेल झेलला. आणि मुंबईच्या किशनला पव्हेलियनचा रस्ता धरण्यास भाग पाडले. आर्चरचा झेल पाहून गोलंदाज त्यागी आणि क्षेत्ररक्षक रियान परागही आश्चर्यचकित झाले.

यानंतर सोशल मीडियावर आर्चरच्या झेलाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात आले.

https://twitter.com/Vishnani_Amit/status/1320379132249698306

किशनने शानदार खेळी करत ३६ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३७ धावा कुटल्या. त्याने दुसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसोबत ८३ धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-Video: फॅब्यूलस फाफ! किंग कोहलीचा झेल घेत दाखवला तंबूचा रस्ता

-चेंडू आहे की बंदुकीची गोळी! नॉर्किएने फेकलेल्या योर्करवर त्रिपाठी क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ

-डू प्सेसिस सुपरमॅनच! विराट, डिविलियर्सचे घेतले भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

-करामती खान! राशिदच्या न उमगणाऱ्या फिरकीवर केएल राहुलची दांडी गुल, पाहा व्हिडिओ

ट्रेंडिंग लेख-

-कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी

-अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती

-IPL च्या १३ व्या हंगामात ‘हे’ ५ मॅच विनर खेळाडू ठरले सुपर फ्लॉप; पहिला क्रमांक आश्चर्यकारक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---