---Advertisement---

चुकीला माफी नाही! बायो बबलचे नियम तोडल्यामुळे बिग बॅश लीगमधील ‘या’ खेळाडूवर झाली कठोर कारवाई

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 1:17 AM
---Advertisement---

बिग बॅश लीग मधील मेलबर्न रेनेगड्स संघासाठी खेळणारा खेळाडू विल सदरलँड याच्यावर बायो बबल मोडण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी सुद्धा क्रिकेटमध्ये सावधगिरी म्हणून क्रिकेटपटूंना बायो बबल मध्येच राहावे लागते. आणि बायो बबल तोडणाऱ्या खेळाडूवर योग्य ती कारवाई केली जाते.

विल सदरलँड याला बायो बबलचे नियम मोडत बाहेरील लोकांसोबत जेवण करतांना पाहिले गेले. तसेच बाहेर जाऊन गोल्फ खेळताना सुद्धा पाहिले गेले. याच कारणास्तव त्याच्यावर दंड आकारण्यात आला आहे. तसेच स्पर्धेच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, विल सदरलँड याने आपली चूक मान्य केली आहे.

दंड भरण्यास दिला नकार

विल सदरलँड याने आपली चूक मान्य तर केली आहे परंतु दंड भरण्यास नकार दिला आहे. स्पर्धेच्या व्यवस्थापकांतर्फे त्याच्यावर १० हजार डॉलर्स इतका दंड आकारण्यात आला होता. परंतु त्याने भरण्यास नकार दिल्यामुळे हा दंड ५ हजार डॉलर्स इतका करण्यात आला आहे.

याआधी सुद्धा बिग बॅश मध्ये मोडले होते बायो बबलचे नियम

डिसेंबर मध्ये सुद्धा अशी घटना घडली होती. त्यावेळी ब्रिस्बेन हिट संघासाठी खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडू क्रिस लीन आणि डॅन लॉरेंस यांच्यावर बायो बबल मोडण्यामुळे दंड आकारण्यात आला होता. याआधी दुबई मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत ही बायो बबलचा वापर केला गेला होता परंतु सर्व खेळाडूंनी बायो बबलचे काटेकोरपणे पालन केले होते. आता इंग्लंड संघ भारतीय दौऱ्यासाठी आला आहे. इंग्लंड संघालाही बायो बबल चे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

आयपीएल 2021 साठीच्या लिलावात सहभागी होणार अर्जुन तेंडुलकर, इतकी असेल बेस प्राईस

मेरा नाम है वॉशिंग्टन, रिषभ पंतने भर मैदानात रचले नवीन गाणे, पाहा भन्नाट व्हिडिओ

BAN vs WI : मेहदी हसनची अष्टपैलू कामगिरी, पहिल्या कसोटीवर बांग्लादेशची मजबूत पकड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---