युरोपा लीगमध्ये पहिल्याच सामन्यात चेल्सीने स्टार फुटबॉलपटू एडन हॅजार्डच्या अनुपस्थितीत पीएओके क्लबला 1-0 असे पराभूत केले. यावेळी विलियन हा या सामन्याचा शिल्पकार ठरला, त्याने सातव्या मिनिटाला हा विजयी गोल केला.
चेल्सीने प्रीमियर लीगचे सलग पाच सामने जिंकले असून त्यांनी युरोपा लीगचा पहिला सामना जिंकत विजयी सुरूवात केली आहे. या पाच सामन्यात हॅजार्डने पाच गोल केले होते तर कार्डीफ विरुद्ध हॅट्ट्रीक केली होती. मात्र तो या पीएओके विरुद्धच्या सामन्यात नव्हता तर कर्णधार विलियनने योग्य भुमिका पार पाडली.
तसेच चेल्सीने प्रीमियर लीगचा पुढचा एक सामना जिंकला तर ते सलग या लीगचे सहा सामने तीन वेळा जिंकणारा पहिला क्लब ठरेल. याआधी त्यांनी असे 2005 आणि 2009च्या प्रीमियर लीगचे सलग सहा सामने जिंकत विजेतेपदही पटकावले आहे.
तर ते कदाचित या लीगचे विजेतेपद जिंकतील कारण सलग पहिले सहा सामने जिंकून विजेतेपद जिंकणे असे त्यांच्या बाबतीत दोनदा घडले आहे.
पीएओके विरुद्धच्या सामन्यात मॅनेजर मौरिझियो सॅरी यांनी पाच बदल केले होते. यावेळी पीएओकेच्या अल्वारो मोराटाने गोल करण्याच्या भरपूर संधी वाया घालवल्या. त्याला या सामन्यात हॅट्ट्रीक करण्याची संधीही होती.
तसेच चेल्सीचा पेड्रो यावेळी दुखापतग्रस्त झाला. तो ग्रीकचा गोलकिपर अलेक्झांड्रोस पचाकॅलिस याला धडकला. चेल्सीमधून हॅजार्ड बरोबरच डेव्हीड लुइझ, मॅटेओ कोवासिच आणि इमरसन पालमैरी आधीच हे चार खेळाडू बाहेर झाले आहेत. यात आता पेड्रो जखमी असल्याने चेल्सीच्या अ़डचणी वाढल्या आहेत.
युरोपा लीगमध्ये चेल्सीचा पुढील सामना व्हीडिओटन आणि प्रीमियर लीगमध्ये वेस्ट हॅम विरुद्ध आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–क्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नकोसा असा विक्रम
–विराट कोहली लवकरच झळकणार बॉलीवूडपटात?