भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला विश्वचषकाचा पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताने (India Womens Team) पाकिस्तानवर १०७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली आहे. भारतीय कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ५० षटकांत ७ विकेट गमावत २४४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ ४३ षटकांमध्ये १३७ धावांत सर्वबाद झाला. यानंतर अनेक चाहत्यांसह खेळाडूंनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात हा ११वा विजय आहे. एकदिवसीय विश्वचषकात भारत-पाकिस्तान महिला संघाने ४ सामने खेळले आहेत. यांपैकी ४ सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. आजपर्यंत पाकिस्तान महिला संघाने भारतीय महिला संघाला विश्वचषकात सुद्धा पराभूत केले नाही. भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त विजय नोंदवला आहे. भारतीय महिला संघाच्या खेळाडूंनी संघाच्या या विजयाबाबत ट्विटरवर ट्वीट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने भारतीय संघाच्या विजयाचे खूप कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की, भारताने पाकिस्तानला पूर्णपणे धुतले. पाकिस्तानी चाहते या सामन्यानंतर निराश दिसत आहेत. काही चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया ट्विटरवर दिल्या आहेत. यावर व्हीव्हीएस लक्ष्मणने सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
What a spectacular performance by the Indian girls against Pakistan.
That was a thrashing, and in grand style.
Pooja Vastrakar with a valiant innings, the ever so reliable Sneh Rana's great all-round show & Rajeshwari Gayakwad outstanding with the ball.
ChakDe India #IndvPak pic.twitter.com/CyAy04phTt— Virender Sehwag (@virendersehwag) March 6, 2022
What a massive win by the girls…congratulations #teamIndia…well done 🇮🇳🇮🇳🇮🇳 #INDvPAK pic.twitter.com/FDSU5rfFuR
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 6, 2022
Well played India,Pak lacked intent right from the start and never looked on course to chase this one,expect better from the batters. #IndVsPak
— zainab abbas (@ZAbbasOfficial) March 6, 2022
Many congratulations @BCCIWomen on a comprehensive win against Pakistan and starting the World Cup on a spectacular note. Well played. Wishing the girls the very best for the matches ahead. #IndvPak pic.twitter.com/y61tmzIODL
— VVS Laxman (@VVSLaxman281) March 6, 2022
India win by 107 runs. This after they were struggling at 114/6 while batting. A superb turnaround and a great win to start the tournament.
— Ashish Magotra (@clutchplay) March 6, 2022
What a misery this. 8 runs in 7 overs in a 245 chase.
— arfan (@Im__Arfan) March 6, 2022
Terrible loss for 🇵🇰 Women by the hands of all round performance by 🇮🇳 Women.. Pak caught them at backfoot with 118/6 then slipped it from there courtesy Pooja & Sneh they brought in the much need aggression scored quick runs&then it was India's bowling which never let 🇵🇰command.
— Sawera Pasha (@sawerapasha) March 6, 2022
https://twitter.com/18prajakta/status/1500377718411902976
https://twitter.com/4sacinom/status/1500378304733401091
India have won 11 out of 11 Women’s ODIs against Pakistan.#INDvPAK
— Umang Pabari (@UPStatsman) March 6, 2022
भारतीय संघाने ११२ धावांपर्यंतच आपल्या ५ विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी भारतीय संघ जास्त धावा करेल असे वाटले नव्हते, परंतु भारतीय संघाने स्म्रीती मंधाना (५२), स्नेह राणा (५३), पूजा वस्त्राकर (६७) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २४४ धावा केल्या. स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर यांनी सातव्या विकेटसाठी १२२ धावांची भागिदारी केली. दीप्ती शर्माने ४० धावा केल्या. भारताची फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने १० षटकांत ३१ धावा देत ४ विकेट घेतल्या. झूलन गोस्वामीने २९ धावा देत २ विकेट्स घेतल्या, तर राणाने २७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानची कर्णधार बिस्माहने १५ धावा केल्या, तिला दीप्ती शर्माने बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या
कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित सुपर-डुपर हिट, एका डावाने मॅच जिंकत केला मोठा रेकॉर्ड
एकावन्न वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या गावसकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?
आजच्याच दिवशी ५१ वर्षांपूर्वी टीम इंडियाला मिळाला होता हिरा, ज्याने बदलला क्रिकेटचा चेहरामोहरा