भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आज(24 ऑगस्ट) बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2019मध्ये महिला एकेरीच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात चीनच्या चेन यू फेईचा पराभव करत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा पराक्रम केला आहे.
सिंधूने 40 मिनीटे चाललेल्या या उपांत्य फेरीच्या सामन्यात चेन यू फेईचा 21-7,21-14 अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
सिंधूने याआधी या स्पर्धेत 2017 आणि 2018 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण तिला दोन्हीवेळेस अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तसेच 2013 आणि 2014 मध्ये तिला या स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते.
आता यावर्षी तिची सुवर्णपदकाची प्रतिक्षा पूर्ण होणार का हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2019 च्या अंतिम फेरीत रविवारी(25 ऑगस्ट)सिंधूचा सामना जपानच्या नोझोमी ओकुहाराशी होणार आहे.
Hat-trick of finals! 💪@Pvsindhu1 maintains her perfect record against Chinese shuttlers at #BWFWorldChampionships to dismiss WR 3 #ChenYufei 2⃣1⃣-7⃣, 2⃣1⃣-1⃣4⃣ to advance to the final for the 3rd year in a row!
One win away from the #GOLD! 👏#IndiaontheRise #Sindhu pic.twitter.com/kaCbkpECst
— BAI Media (@BAI_Media) August 24, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियनशीप: साईप्रणीतला कांस्यपदक; उपांत्यफेरीत बसला पराभवाचा धक्का
–अरुण जेटलींच्या निधनानंतर आजी-माजी क्रिकेटपटूंनी भावनिक ट्विट करत वाहिली श्रद्धांजली
–विकेट्सचे ‘अर्धशतक’ पूर्ण करताच बुमराहचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश