सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा 38वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशने श्रीलंकेला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. दरम्यान श्रीलंकेच्या डावातील 25व्या षटकात अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट पद्धतीने बाद झाला. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांपासून ते क्रिकेट जाणकारांपर्यंत सर्वांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी बांगलादेश संघाच्या खिलाडूवृत्तीविषयी प्रश्न उपस्थित केले. अशातच सामन्यानंतर चौथे पंच एड्रियन होल्डस्टॉक यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.
सामन्यानंतर चौथे पंच एड्रियन होल्डस्टॉक (Adrian Holdstock) यांनी स्पष्ट केले की, अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याला नियमानुसारच बाद घोषित केले आहे. ब्रॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत एड्रियन होल्डस्टॉक टाईम आऊट (Adrian Holdstock Time Out) बादविषयी बोलताना म्हणाले, “आयसीसी विश्वचषक प्लेइंग कंडिशनमध्ये नमूद केले गेले आहे की, जेव्हा टाईम आऊटची वेळ येते, तेव्हा विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर, नवीन फलंदाज किंवा मैदानातील उपस्थित फलंदाजाला पुढील 2 मिनिटात चेंडू खेळण्यासाठी क्रीझवर सज्ज व्हावे लागते.”
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, “प्रोटोकॉलनुसार, टीव्ही पंच विकेट पडल्यानंतर हे दोन मिनिटे जोडतात. त्यानंतर ते मैदानी पंचांना संदेश देतात. आज जी घटना घडली, त्यात फलंदाज दोन मिनिटांच्या आत चेंडू खेळणाऱ्या पोझिशनमध्ये नव्हता. त्यापूर्वी त्याच्या हेल्मेटची पट्टीमध्ये समस्या झाली होती. श्रीलंकेचा अष्टपैलूच्या हेल्मेट पट्टी तुटल्यामुळे आधीच दोन मिनिटे पूर्ण झाली होती.”
https://www.instagram.com/reel/CzTi6fFPMM0/?utm_source=ig_embed&ig_rid=8d68851e-eab0-4ed1-9275-74c42ee5dc0d
यावेळी त्यांना विचारण्यात आले की, टाईम आऊट याची अपील कोण करू शकते? याचे उत्तर देताना ते म्हणाले, “प्लेइंग कंडिशननुसार, क्षेत्ररक्षण संघाचा कर्णधार मैदानात उपस्थित पंचांकडे टाईम आऊटची अपील करू शकतो.”
यादरम्यान होल्डस्टॉक यांना असेही विचारण्यात आले की, “टाईम आऊटमध्ये वस्तूंच्या खराब होण्याचे नमूद नाहीये का?” यावर ते म्हणाले की, “नाही, एक फलंदाज म्हणून नेहमीच तुम्हाला मैदानावर उतरण्यापूर्वी आपल्या वस्तूंची तपासणी करावी लागते, कारण पुढील दोन मिनिटात तुम्हाला मैदानावर चेंडूचा सामना करायचा असतो. फलंदाजाला मैदानावर 15 सेकंदात पोहोचले पाहिजे, जेणेकरून सर्व गोष्टी पुन्हा तिथे जाऊन तपासली जाऊ शकतील.”
दुसऱ्या एका व्हिडिओत वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू आणि समालोचक इयान बिशप यांनी सांगितले की, “मैदानी पंचांनी अँजेलो मॅथ्यूजच्या विनंतीच्या आधारे दोन वेळा शाकिबला विचारले की, त्याला अपील मागे घ्यायची आहे का? पण त्याने स्पष्टपणे नकार दिला होता.”
https://www.instagram.com/reel/CzTwYDjPb3O/?utm_source=ig_embed&ig_rid=f1c7c207-8c95-4416-b0dd-de8164602d50
टाईम होणारा पहिलाच खेळाडू
अँजेलो मॅथ्यूज हा क्रिकेट इतिहासात टाईम आऊट पद्धतीने बाद होणारा पहिलाच खेळाडू ठरला. मॅथ्यूज या सामन्यात एकही चेंडू न खेळताच तंबूत परतला. त्यामुळे त्याला चांगलाच राग आला होता. त्याचा राग मैदानाबाहेर जाताना स्पष्टपणे दिसला. त्याने यावेळी हातातील हेल्मेट सीमारेषेवरच फेकले होते. आता टाईम आऊटविषयीच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. (World Cup 2023 ban vs sl fourth umpire adrian holdstock explains rare angelo mathews timed dismissal BAN vs SL Match)
हेही वाचा-
‘शाकिबसाठी खूप आदर होता, पण आता…’, बांगलादेश संघ आणि अंपायरवर बरसला Angelo Mathews
‘मला ॲंजेलोने रिक्वेस्ट केली, पण….’, बांगलादेश कर्णधार शाकिबचा धक्कादायक खुलासा