CWC 23 Team India Record: भारतीय संघाच्या गोलंदाजांनी विश्वचषक 2023 स्पर्धेत खास विक्रम रचला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने अंतिम सामन्यात स्टीव्ह स्मिथ याची विकेट घेताच ऑस्ट्रेलिया संघाचा 16 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त झाला आहे. विश्वचषकाच्या एका हंगामात भारत सर्वाधिक विकेट्स घेणारा संघ बनला आहे. चला तर, भारताने किती विकेट्स घेतल्यात पाहूयात…
भारतीय गोलंदाजांनी घडवला इतिहास
या सामन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 10 विकेट्स गमावत 240 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 47 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. या तिन्ही विकेट्सपैकी एक मोहम्मद शमीने (Mohammed Shami) एक आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने दोन विकेट्स घेतल्या. या तीन विकेट्स मिळताच भारताने विश्वचषक 2023मध्ये खास विक्रम बनवला. भारतीय संघ विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा संघ बनला.
भारतीय गोलंदाजांनी विश्वचषक 2023 स्पर्धेत 98 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह याने स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याची विकेट घेताच भारताच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 16 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त केला. 2007मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी स्पर्धेत एकूण 97 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, 2003 विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनीच 96 विकेट्स घेतल्या होत्या. 2019 मध्ये इंग्लंडने 90 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, दक्षिण आफ्रिकेने याच विश्वचषकात 88 विकेट्स घेतल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब
अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने खराब सुरुवात केली. शमीने डेविड वॉर्नर याला फक्त 7 धावांवर तंबूत पाठवले. तसेच, मिचेल मार्श यानेही 15 धावांवर मैदान सोडले. स्टीव्ह स्मिथही खास प्रदर्शन करू शकला नाही. तो 4 धावांवर बुमराहची दुसरी शिकार बनला. (world cup 2023 ind vs aus final team india break australia record becomes top team to get most wickets for bowlers in single odi world cup read here)
हेही वाचा-
World Cup Final मध्ये भारत आघाडीवर! 10 षटकातच ऑस्ट्रेलियाची हालत खस्ता, शमी-बुमराह बरसले
भलेभले आले, पण 48 वर्षांच्या World Cup इतिहासात ‘असा’ पराक्रम रोहितशिवाय कुठल्याच कर्णधाराला नाही जमला, वाचा