तब्बल 45 दिवस चालणाऱ्या आणि 48 सामन्यांचा समावेश असणारी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. या स्पर्धेला पुढील महिन्यात म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड संघातील सामन्याने स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. मात्र, अनेक क्रिकेटप्रेमी असेही आहेत, ज्यांना वनडे विश्वचषकाच्या 13व्या हंगामातील बऱ्याच गोष्टी माहिती नाहीयेत. जसे की, स्पर्धेचा फॉरमॅट, नियम आणि वेळापत्रक. याच गोष्टी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
भारतीय संघ (Team India) विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करेल. याव्यतिरिक्त भारतीय संघाचा दुसरा सामना 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. खरं तर, हा सामना सुरुवातीला 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव या सामन्याच्या तारखेमध्ये बदल करत एक दिवस आधी खेळवला जाईल. खरं तर, हा सामना जगातील सर्वात मोठे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिअम, अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे.
विश्वचषकाचा फॉरमॅट- राऊंड रॉबिन
विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्व संघ इतर 9 संघांविरुद्ध राऊंड रॉबिन पद्धतीने खेळतील. म्हणजेच, प्रत्येक संघाला इतर 9 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळावा लागेल. यांमधील गुणतालिकेत जे संघ अव्वल 4 स्थानावर असतील, त्यांना उपांत्य सामन्यात जागा मिळवता येईल. तसेच, इथे विजय मिळवणारे संघ पुढे अंतिम सामन्यात एकमेकांचा सामना करतील.
विश्वचषकापूर्वी सराव सामने
विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी सर्व 10 संघ प्रत्येकी 2 सराव सामने खेळतील. या सामन्यांचे आयोजन 3 वेगवेगळ्या शहरांमध्ये केले जाईल. हे सामने 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर यादरम्यान गुवाहाटी, हैदराबाद आणि तिरुवनंतपुरम येथे खेळले जातील. सर्व सराव सामना दुपारी 2 वाजता सुरू होतील. सराव सामन्यांमध्ये प्रत्येक संघ आपल्या सर्व 15 खेळाडूंना उतरवू शकतात.
भारतीय संघ इंग्लंड आणि नेदरलँडविरुद्ध सराव सामने खेळण्यासाठी उतरणार आहे. 30 सप्टेंबरला भारत इंग्लंडविरुद्ध गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडिअममध्ये भिडेल. तसेच, भारताचा दुसरा सराव सामना 3 ऑक्टोबर रोजी तिरुवनंतपुरम येथे नेदरलँडविरुद्ध भिडेल.
विश्वचषकातील नियम
– विश्वचषक 2023मध्ये प्रत्येकी 45 मिनिटांच्या ब्रेकने 3.5 तासांचे 2 सत्र असतील.
– नाणेफेक झाल्यानंतर संघांचे कर्णधार त्यांच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल सांगतील.
– प्रत्येक गोलंदाजाला जास्तीत जास्त 10 षटके टाकण्याची परवानगी (पावसाच्या व्यत्ययाने सामना कमी षटकांचा झाला, तर प्रत्येक गोलंदाज एकूण षटकांपैकी 20 टक्के षटके टाकू शकतो.)
*क्षेत्ररक्षण निर्बंध आणि पॉवरप्ले
– एका डावाच्या पहिल्या 10 षटकांमध्ये (अनिवार्य पॉवरप्ले), क्षेत्ररक्षण करणारा संघ 30-यार्ड वर्तुळाबाहेर जास्तीत जास्त दोन क्षेत्ररक्षक ठेवू शकतो. (हे पॉवरप्ले दरम्यान फक्त आक्रमण फील्ड सेट करण्याची परवानगी असेल.)
– सामन्यात 11 आणि 40 षटकांच्या दरम्यान चार क्षेत्ररक्षक 30-यार्ड वर्तुळाबाहेर थांबू शकतात. (दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये एकतर अटॅकिंग किंवा नॉर्मल फील्ड सेट केले जाऊ शकते.)
– अखेरच्या 10 षटकात, गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला 30-यार्ड वर्तुळाबाहेर 5 क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी असेल.
– तिसर्या पॉवरप्लेमध्ये तिन्ही प्रकारची फील्ड (आक्रमक, बचावात्मक आणि सामान्य फील्ड) वापरली जाऊ शकते.
– तीन पॉवरप्ले अनुक्रमे P1, P2 आणि P3 द्वारे दाखवले जातात. सामान्यतः आधुनिक स्कोअरकार्डमध्ये स्कोअरच्या जवळ हे दाखवले जाते.
– दुसऱ्या संघाने सर्व विकेट्स गमावल्यावर किंवा सर्व षटके संपल्यानंतर दोन्ही संघांनी केलेल्या धावांची संख्या समान असल्यास, खेळ टाय घोषित केला जातो. (दोन्ही संघाने गमावलेल्या विकेट्सची पर्वा न करता).
– सामना टाय झाल्यास, बादफेरी आणि अंतिम सामन्यासाठी सुपर ओव्हर टाकली जाईल.
– जर हवामानाच्या परिस्थितीमुळे सामनाधिकाऱ्यांना दीर्घ कालावधीसाठी खेळ थांबवावा लागला, तर सामना त्याच्या राखीव दिवसापर्यंत पुढे ढकलला जाईल. (केवळ उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी)
– राखीव दिवस नसलेल्या सामन्यांसाठी, सामन्याचा विजेता निश्चित करण्यासाठी डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाईल.
बादफेरीतील सामन्यांचे नियम
– जर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला, तर त्यांचा सामना कोलकाता येथे खेळवला जाईल.
– जर भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर त्यांचा सामना पाकिस्तानविरुद्ध न खेळता मुंबई होईल. जर भारत-पाकिस्तान आमने-सामने आले, तर उपांत्य सामना कोलकाता येथे खेळला जाईल. (World Cup 2023 Tournament Format, Rules and Schedule Know here)
विश्वचषक 2023चे संपूर्ण वेळापत्रक : Indian team schedule for World Cup 2023
8 ऑक्टोबर- भारत वि. ऑस्ट्रेलिया, ठिकाण- चेन्नई (IND vs AUS, Oct 8, Chennai)
11 ऑक्टोबर- भारत वि. अफगाणिस्तान, ठिकाण- दिल्ली (IND vs AFG, Oct 11, Delhi)
14 ऑक्टोबर- भारत वि. पाकिस्तान, ठिकाण- अहमदाबाद (IND vs PAK, Oct 14, Ahmedabad)
19 ऑक्टोबर- भारत वि. बांगलादेश, ठिकाण- पुणे (IND vs BAN, Oct 19, Pune)
22 ऑक्टोबर- भारत वि. न्यूझीलंड, ठिकाण- धरमशाला (IND vs NZ, Oct 22, Dharamsala)
29 ऑक्टोबर- भारत वि. इंग्लंड, ठिकाण- लखनऊ (IND vs ENG, Oct 29, Lucknow)
2 नोव्हेंबर- भारत वि. श्रीलंका, ठिकाण- मुंबई (IND vs SL, Nov 2, Mumbai)
5 नोव्हेंबर- भारत वि. दक्षिण आफ्रिका, ठिकाण- कोलकाता (IND vs SA, Nov 5, Kolkata)
12 नोव्हेंबर- भारत वि. नेदरलँड, ठिकाण- बंगळुरु (IND vs NED, Nov 12, Bengaluru)
15 नोव्हेंबर- पहिला उपांत्य सामना, ठिकाण- मुंबई (First Semi-Final, Nov 15, Mumbai)
16 नोव्हेंबर- दुसरा उपांत्य सामना, ठिकाण- कोलकाता (Second Semi Final, Nov 16, Kolkata)
19 नोव्हेंबर- अंतिम सामना, ठिकाण- अहमदाबाद (Final, Nov 19, Ahmedabad)
विश्वचषक विशेष-
किस्से वर्ल्डकपचे: वर्ल्डकप म्हटलं की 2003 ची फायनल आणि पॉंटिंग डोक्यातून जात नाही
किस्से वर्ल्डकपचे: त्यादिवशी चिन्नास्वामीवर केविन ओब्रायनने इंग्लडला गुडघ्यावर आणलेलं
World Cup 2023 Preview: 10 संघांपासून ते सामन्यांच्या ठिकाणांपर्यंत, सर्व माहिती एकाच क्लिकवर
कशी आहे विराटची World Cupमधील कामगिरी? 2 वर्ल्डकपमध्ये ठोकलंय शतक, वाचा लेखाजोखा
विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, हुकमी एक्का बाहेर; 15 महिन्यांनंतर ‘या’ धुरंधराचे कमबॅक