आयसीसी वनडे विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला. त्यांनी रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभूत करत 6व्यांदा विश्वचषकाचा किताब आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ट्रेविस हेड ठरला. हेडला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यानंतर त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्याविषयी दोन शब्द बोलून त्याच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले. 12 वर्षांनंतरही भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवता आला नाही. विश्वचषक अंतिम सामन्यात 20 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा भारतीय संघ आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या आशांवर पाणी फेरले.
काय म्हणाला हेड?
नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Staidum) पार पडलेल्या या सामन्यात ट्रेविस हेड (Travis Head) याने 120 चेंडूंचा सामना करताना 137 धावांची झंझावाती शतकी खेळी केली. त्याच्या खेळीत 4 षटकार आणि 15 चौकारांचा समावेश होता. विजयानंतर तो म्हणाला, “याची अपेक्षा कधीच केली नव्हती. घरी सोफ्यावर बसून पाहण्यापेक्षा खूप चांगले आहे. योगदान देऊन वास्तवात आनंद झाला. मी जे पहिले 20 चेंडू खेळलो, त्यामुळे मला जास्त आत्मविश्वास मिळाला. आणि हो, मी हे चालू ठेवण्यात यशस्वी राहिलो. ज्याप्रकारे मार्श आला आणि त्याने खेळ पुढे नेला, त्याने माहोल तयार केला. आम्हाला हीच ऊर्जा हवी होती आणि आम्हाला माहिती होते की, खेळपट्टी कठीण असू शकते. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय चांगला होता. मला वाटले की, जसजसा दिवस पुढे गेला, खेळपट्टी चांगली होत गेली.”
‘रोहित शर्मा दुर्दैवी’
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याविषयी बोलताना हेड म्हणाला, “तो कदाचित जगातील सर्वात दुर्दैवी व्यक्ती आहे. क्षेत्ररक्षण अशी गोष्ट आहे, ज्यावर मी कठोर मेहनत घेतली आहे. मी शतक करण्याची कल्पनाही करू शकत नव्हतो. रोहित शर्माचा झेल पकडणे खूपच चांगले होते. आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, खचाखच भरलेल्या स्टेडिअमपुढे मोठ्या स्पर्धेत असे करण्यात सक्षम होणे एक चांगली गोष्ट आहे.”
विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाच्या गोलंदाजांनी चांगली झुंज दिली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने सुरुवातीच्या 3 फलंदाजांना बाद केले होते. मात्र, ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्युशेन यांच्या शानदार भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 43 षटकात 6 विकेट्स राखून जिंकला. यासह ऑस्ट्रेलिया संघ सहाव्यांदा किताब जिंकण्यात यशस्वी झाला. (world cup 2023 unluckiest man match winner travis head on skipper rohit sharma after winning century ind vs aus final read)
हेही वाचा-
गावसकरांनी सांगितला IND vs AUS Finalचा टर्निंग पॉईंट; रोहितचं नाव घेत म्हणाले, ‘….गरजच नव्हती’
CWC23 FINAL: 6व्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनताच कमिन्सची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ…’