अवघे क्रिकेटविश्व वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी आतुर झाले आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहेत. या सामन्याला आता काही तासांचा कालावधी उरला आहे. अशात आपण नजर टाकूया की, वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आत्तापर्यंत झालेल्या नाणेफेकीनंतर सामन्याचा निकाल काय लागला आहे.
अहमदाबाद येथे होणाऱ्या या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे आतापर्यंत वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नाणेफेकीनंतर किती संघ विजयी झाले हे आपण पाहूया.
इंग्लंडमध्ये 1975 मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकावेळी ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीज संघ अंतिम सामन्यात भिडले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकलेली मात्र विजय मिळवण्यात त्यांना अपयश आलेले. तर 1979 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने पुन्हा एकदा नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंडला पराभूत करत दुसरे विजेतेपद जिंकले होते. भारतीय संघाने 1983 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाणेफेक हरल्यानंतरच विजेतेपदाला गवसणी घातली होती.
त्यानंतर झालेल्या 1987 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने ही परंपरा मोडीत काढली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला नाणेफेक जिंकल्यानंतर पराभूत केले होते. 1992 मध्ये देखील पाकिस्ताननेही नाणेफेक जिंकल्यानंतरच विजेतेपद पटकावले होते. 1996 मध्ये श्रीलंकेने देखील अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचा कारनामा केला होता.
ऑस्ट्रेलियन संघाने 1999 व 2003 मध्ये नाणेफेक गमावल्यानंतरही अनुक्रमे पाकिस्तान व भारतीय संघाला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते. 2007 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकल्यानंतरच विजेतेपद आपल्या नावे केले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या मागील तीनही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ कधीही विजेतेपद पटकावू शकला नाही. 2011 मध्ये श्रीलंकेने नाणेफेक जिंकलेली मात्र ते भारताविरुद्ध पराभूत झालेले. 2015 मध्ये न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने त्यांना पराभूत केले होते. तर, मागील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकल्यानंतरही इंग्लंडकडून पराभव झाला होता.
(World Cup Final 2023 History Of Toss In ODI World Cup Final)
हेही वाचा-
‘भारताने पहिली बॅटिंग केली, तर संपलं सगळं…’, CWC 2023 Finalच्या एक दिवसाआधी दिग्गजाची भविष्यवाणी
WHOOP: सचिनचा विक्रम मोडताना विराटच्या मनगटावर होते ‘हे’ खास फिटनेस बँड, फीचर्स पाहून चकितच व्हाल