साउथॅम्पटन। आयसीसी 2019 विश्वचषकात आज(5जून) आठवा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात होणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेचा या विश्वचषकातील तिसरा सामना आहे, तर भारताचा पहिलाच सामना आहे. हा सामना द रोज बॉल स्टेडियमवर होत आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात हाशिम अमलाने पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर ताब्राईज शम्सीला आज दक्षिण आफ्रिकेने संधी दिली आहे.
त्याचबरोबर भारताच्या संघात केदार जाधवला संधी देण्यात आली आहे. तसेच वेगवान गोलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला संधी देण्यात आली आहे. तर फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे दोघेही 11 जणांच्या संघात आहेत. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी केएल राहुलचा आज भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
या विश्वचषकात या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड आणि बांगलादेश विरुद्ध पराभव स्विकारला आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून विजयी मार्गावर परतण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तर भारताचा हा पहिलाच सामना असल्याने भारतीय संघ विजयाने विश्वचषक 2019 ची सुरवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत सामन्यासाठी असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, केदार जाधव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिका – फाफ डु प्लेसिस(कर्णधार), क्विंटॉन डी कॉक, हाशिम आमला, रस्सी वॅन दर दसन, डेविड मिलर, जेपी ड्यूमिनी, अँडील फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, इम्रान ताहिर, ख्रिस मॉरिस, ताब्राईज शम्सी.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–जेव्हा जेव्हा भारत विश्वचषकातील पहिला सामना जिंकतो…
–विश्वचषक २०१९: …तर आजचा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना होऊ शकतो रद्द
–ज्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली पदार्पण केले त्याचाच विक्रम आज धोनी मोडणार?
–रोहित शर्माला आज विश्वचषकात हिट विक्रम करण्याची संधी, सौरव दादालाही टाकू शकतो मागे