बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारताचा 3-1 असा पराभव झाला. पण यशस्वी जयस्वालसाठी ही मालिका खूप चांगली ठरली. या मालिकेत तो टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर त्याने एकूण 391 धावा केल्या. मालिकेतील पहिल्या कसोटीत म्हणजेच पर्थमध्ये 161 धावांची खेळी खेळली. आता एका मीडिया रिपोर्टमधून समोर आले आहे की, कसोटी मालिकेतील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी निवडकर्ते जयस्वालला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय संघात आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळण्याची संधी देऊ शकतात.
रेव्ह स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, यशस्वी जयस्वाल इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी सलामी करताना दिसू शकते. जयस्वालने कसोटी आणि टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. परंतु आतापर्यंत त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केलेले नाही. रोहित शर्माबद्दल आधीच पुष्टी झाली आहे की तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवेल आणि या अहवालानुसार जयस्वालला बॅकअप ओपनर म्हणून टीम इंडियामध्ये ठेवण्यात येईल. तर शुबमन गिल रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करणार आहे.
विराट कोहली आणि श्रेयस अय्यर अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. केएल राहुल आणि रिषभ पंत यांच्यात यष्टिरक्षकाची भूमिका मिळविण्यासाठी स्पर्धा आहे. तर अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे दोघे मिळून फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकतात. वॉशिंग्टन सुंदरलाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हार्दिक पांड्या देखील एकदिवसीय संघाचा भाग असेल, परंतु नितीश कुमार रेड्डीला स्थान मिळेल की नाही. याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. 2024 मध्ये सात टी-20 सामन्यांत 17 बळी घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीवरही निवड समिती लक्ष ठेवून आहे. मात्र 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये त्याला स्थान मिळण्याबाबत साशंकता आहे.
हेही वाचा-
खराब फॉर्ममधून जाणाऱ्या विराट-रोहितला युवराज सिंगची साथ, म्हणाला ‘माझ्यासाठी कुटुंबासारखे….
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार? जाणून घ्या एका क्लिकवर
PAK vs SA: पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, दक्षिण आफ्रिकेचा विजयी रथ कायम