भारताचा युवा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळण्यास सज्ज आहे. या संदर्भात त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. मुंबई आणि जम्मू-काश्मीर संघातील सामना (23 जानेवारी) पासून खेळला जाईल. दोन्ही संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आमने-सामने असतील.
यशस्वी जयस्वालने या सामन्यासाठी स्वतःला उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, यशस्वी जयस्वालने त्याचे प्रशिक्षक ओंकार साळवी यांना सांगितले की, तो रणजी ट्रॉफीसाठी उपलब्ध आहे. रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीत यशस्वी जयस्वाल मुंबईच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. तथापि, रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीसाठी मुंबई संघाची निवड अद्याप झालेली नाही.
मंगळवारी (14 जानेवारी) रोजी रोहित शर्माने (Rohit Sharma) मुंबई संघासोबत सराव केला. जर रोहित शर्मा पुढच्या फेरीत प्रवेश करतो, तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) सारखे महान खेळाडू मुंबई संघात दिसू शकतात. त्याच वेळी, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरूद्ध टी20 आणि वनडे सामन्यांची मालिका खेळेल. इंग्लंडविरूद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरताना दिसणार आहे.
भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. यानंतर, दोन्ही संघ वनडे मालिकेत आमने-सामने असतील. टी20 मालिकेची सुरूवात (22 जानेवारी) पासून होणार आहे. यानंतर, वनडे मालिका 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाईल. इंग्लंड मालिकेनंतर, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी बारामती सज्ज
भारतीय संघानंतर गौतम गंभीरच्या कोचिंगचाही आढावा घेणार बीसीसीआय
जसप्रीत बुमराहची हवा, जिंकला आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार…!