कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. अशामध्ये सर्व दिग्गज व्यक्ती आपापल्या देशात होईल ती मदत करत आहेत. अशीच काही मदत पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने केली होती.
आफ्रिदीने त्याच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून आपल्या देशातील गरजू लोकांना आवश्यक ती मदत केली होती. यावर भारतीय संघाचे क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि हरभजन सिंगने (Harbhajan Singh) मंगळवारी (31 मार्च) आफ्रिदीच्या फाऊंडेशनने लोकांची मदत केल्यामुळे त्याची प्रशंसा केली होती.
युवराजने आफ्रिदीच्या (Shahid Afridi) फाऊंडेशनची प्रशंसा केल्यामुळे चाहत्यांनी युवराजवर टीका करायला सुरुवात केली होती. तर काही चाहत्यांनी यावेळी पाठिंबाही दिला होता.
युवराजने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, “हा एक कठीण काळ आहे. अशावेळी आपण बाधित लोकांची मदत केली पाहिजे. आपण आपले काम केले पाहिजे. मी शाहिद आफ्रिदीला आणि त्याच्या फाऊंडेशनला पाठिंबा देतो. जे कोरोना व्हायरसविरुद्ध लढत आहे. डोनेट कोरोना डॉट कॉमवर मदत करा.”
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1244873490303340544
युवराजचे ट्वीट काही चाहत्यांना आवडले नाही. यावेळी चाहत्यांनी युवराजवर टीका करत म्हटले की, शाहिद तो व्यक्ती आहे ज्याने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पाठिंबा दिला होता. माणूसकी ठीक आहे. परंतु ज्याने माणूसकीचा पैसाही दहशतवाद्यांना तयार करण्यासाठी घातला आहे, त्यांच्यासाठी तू माणूसकी दाखव.
यावेळी युवराजने चाहत्यांच्या टीकेला दूर करताना स्पष्ट केले की, त्याला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. त्याने फक्त कोविड-१९ व्हायरसने (Covid-19 Virus) बाधित झालेल्या लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला होता.
“मला एक कळत नाही की लोकांची मदत करण्याच्या एका मेसेजला लोकांनी इतके मोठे रुप कसे काय दिले. मी फक्त इतकेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की, आपण आपल्या देशातील लोकांना आवश्यक सामान देऊन मदत करावी,” असे युवराजने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सांगितले.
“मी एक भारतीय आहे. नेहमीच असणार आहे. त्याचबरोबर मी नेहमीच माणूसकीच्या बाजूने उभा राहिल. जय हिंद,” असेही युवराज यावेळी म्हणाला.
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1245295251385958400
२०११ विश्वचषक विशेष-
–धोनीने ज्या बॅटने षटकार मारत विश्वचषक जिंकला तिला मिळाली भलतीच किंमत
–२०११ विश्वचषक विजयातील केवळ एक हिरो आहे सध्याच्या टीम इंडियाचा सदस्य
–तो षटकार, ते मैदान आणि तो इतिहास….
–आठवण – भारताच्या विश्वविजयाची
–गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार, २०११ ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक
–का झाला होता २०११च्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन वेळा टाॅस?