भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने इंस्टाग्रामवर भारतीय संघाच्या क्रिकेटपटूंचे फिमेल व्हर्जन फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर सर्वांना नक्कीच हसू येईल.
युवराजने या क्रिकेटपटूंचे जेंडर स्वॅप पिक्चरनंतर लिहिले, “यापैकी कोणाला तुम्ही तुमची प्रेयसी म्हणून पसंत कराल. मी माझं उत्तर उद्या देईल,”
या फोटोंमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, केएल राहुल, रविंद्र जडेजा, एमएस धोनी, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह हे सर्वजण मुलींसारखे दिसत आहेत.
यापूर्वी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) रोहितचा (Rohit Sharma) फिमेल फोटो बनविला होता. तसेच, त्याने ट्विटरवर लिहिले होते, “रोहिता शर्मा भाऊ तू खूप गोंडस दिसत आहेस.”
So cute u looking Rohitaaaaaa Sharammaaaaa bhaiya @ImRo45 ❤️???????????????????????? pic.twitter.com/HxftQD3Qer
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) June 18, 2020
युवराजच्या (Yuvraj Singh) या पोस्टवर बर्याच खेळाडूंनी रिप्लाय देखील दिले आहेत. केविन पीटरसन आणि हरभजन सिंग यांना भुवनेश्वर कुमारचा फीमेल फोटो खूपच आवडला आहे. अगदी भुवीनेही स्वत:चा फिमेल फोटो सर्वात सुंदर म्हणून त्याचे वर्णन केले आहे. भुवीने कमेंटमध्ये लिहलं की मी भुवीला निवडू इच्छितो.
ट्रेंडिंग घडामोडी-
-चुकिला माफी नाही! ५ अशा घटना जेव्हा पेनल्टी म्हणून विरोधी संघाला मिळाल्या ५ धावा
-क्रिकेटचं काय घेऊन बसलाय! या ५ क्रिकेटर्सने गाजवलेत दुसरेही खेळ
-आयपीएलमधील ५ अशा टीम, ज्यांनी खेळाडूंवर खर्च केलाय पाण्यासारखा पैसा