एमएस धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या खोट्या, एमएसके प्रसाद यांनी केला मोठा खूलासा

2 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आज 15 जणांचा भारतीय संघ जाहीर झाला. हा संघ जाहीर करताना बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या खोट्या असल्याचेही स्पष्ट केले आहे.

प्रसाद म्हणाले, ‘धोनीच्या निवृत्तीबद्दल कोणतेही अपडेट्स आलेले नाही. निवृत्तीचे वृत्त खोटे आहे. ‘

तसेच धोनीची पत्नी साक्षीनेही ‘याला अफवा म्हणतात’ असे ट्विट करत धोनी आज निवृत्त होणार नसल्याचे सुचवल्याची शक्यता आहे.

आज(12 सप्टेंबर) भारताचा कर्णधार विराट कोहलीने धोनीबरोबरचा 2016 टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला त्याने कॅप्शन दिले होते की ‘हा सामना मी कधीही विसरु शकत नाही. खास रात्र होती. या व्यक्तीने(धोनीने) मला फिटनेस टेस्ट प्रमाणे धावायला लावले होते.’

विराटच्या या पोस्ट नंतर अचानक धोनी आज निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाल्या. तसेच याबद्दलच्या पोस्टही व्हायरल झाल्या होत्या. परंतू आता प्रसाद यांनी धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या चूकीच्या असल्याचे म्हणत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

धोनी त्याचा शेवटचा सामना भारताकडून 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध जूलैमध्ये खेळला आहे. त्यानंतर तो वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी अनुपलब्ध होता. तसेच 15 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी20 मालिकेसाठीही तो अनुपलब्ध आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

ठरलं! आता रोहित शर्मा कसोटीत करणार या क्रमांकावर फलंदाजी

केएल राहुलला टीम इंडियातून वगळले; गिलला मिळाली द.आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संधी

११ वर्षांपूर्वी कानाखाली मारलेल्या श्रीसंतला हरभजनने ट्विट करत दिल्या खास शुभेच्छा…

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.