पाकिस्तान क्रिकेट संघासाठी गुरुवारी (20 जुलै) एक धक्कादायक बातमी समोर आली. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा गुणवंत खेळाडू आयशा नसीम हिने अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी तिने हा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इस्लाम धर्मानुसार आपले आयुष्य जकण्याचे कारण देत तिने निर्णय घेतला आहे.
आयशा नसीम (Ayesha Naseem) ही मागच्या काही वर्षांमध्ये पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा महत्वाची खेळाडू बनली होती. 2020 मध्ये तिने पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिने खूप कमी कालावधीमध्ये पाकिस्तानसाठी 4 वनडे आणि 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. वनडे क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 33, तर टी-20 क्रिकेटमद्ये 269 धावांची नोंद आहे. नाबाद 45 ही तीची टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे. पाकिस्तानसाठी तीने एकूण 34 सामने खेळले असले तरी यादरम्यान एखही शतक किंवा अर्धशतक आयशा करू शकली नाही.
आयशाकडून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची माहीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाली. तिने इस्लाम धर्मानुसार आयुष्य घालवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. “मी क्रिकेट सोडत आहे आणि इस्लामनुसार आपले आयुष्य जगणार आहे,” असे ती म्हणाली.
आयशाच्या आपल्या टी-20 कारकिर्दीत एकूण 18 षटकार मारले आहेत. पाकिस्तानसाठी टी-20 क्रिकेटमध्ये आयशापेक्षा जास्त षटकार फक्त निदा डार हिने मारले आहेत. निदा दारने आपल्या कारकिर्दीतील 130 टी-20 सामन्यांमध्ये 27 षटकार मारले आहेत. आयशा नसीम आपल्या षटकारांसाठी प्रसिद्ध होती. तिने 2023 महिला टी-20 विश्वचषकात सर्वात दोन सर्वात लांब षटकार मारले होत. भारताविरुद्ध मारलेला 81 मीटरचा षटकात स्पर्धेतील सर्वात लांब षटकार ठरला होता. तसेच आयर्लंडविरुद्ध 79 मीटरचा षटकात तिच्या बॅटमधून निघाला होता. 2023च्या सुरुवातीला संघासोबत ती ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होती आणि त्याठिकाणीही तिने एखापेक्षा एक षटकार मारले होते. (18 year old Pakistani cricketer Ayesha Naseem announces retirement from cricket )
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या माजी खेळाडूने भारताविरुद्ध ओकली गरळ! म्हणाला, ‘जर आम्ही ओव्हलमध्ये जिंकू शकतो, तर…’
Ashes 2023 । ख्रिस वोक्सने घेतलं विकेट्सचं पंचक! दुसऱ्या दिवशी 18 धावां करून ऑस्ट्रेलिया सर्वबाद